अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हे दाखल करा : मुंबई उच्च न्यायालय

अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हे दाखल करा : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) सुमारे २५ हजार कोटी रु.च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत फिर्याद नोंदवण्याचे आदेश गुरु

राज्यातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य
‘आम्हाला फसवून नेले’
याचसाठी केला होता अट्टाहास !

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) सुमारे २५ हजार कोटी रु.च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत फिर्याद नोंदवण्याचे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ , शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचा समावेश असून यांनी आपल्या मर्जीतील संस्था व व्यक्तींना नियमबाह्य कर्जे दिल्याने ही बँक अडचणीत सापडल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी एका जनहित याचिकेत केला होता. त्यावर या अगोदर राखून ठेवलेला निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नियमबाह्य कर्जवाटप केल्याने या बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून प्रशासक आणून बसवावा लागला. पण त्यानंतर नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इ.चे अहवाल असूनही या नेत्यांविरोधात काहीच कारवाई झाली नसल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या एकूण आर्थिक प्रकरणात सुरिंदर अरोरा यांचा जबाब गेल्या जानेवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतला होता पण त्यावर काहीच कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांनी तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0