अमरिंदर सिंग यांची ‘पंजाब लोक काँग्रेस पार्टी’

अमरिंदर सिंग यांची ‘पंजाब लोक काँग्रेस पार्टी’

चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे पंजाबमधील एक मातब्बर नेते अमरिंदर सिंग यांनी अखेर मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्

‘झुंडशाही थांबवा’-४९ मान्यवरांचे मोदींना पत्र
नकवींच्या निवृत्तीनंतर भाजपचा एकही मुस्लिम सदस्य संसदेत नाही
प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी

चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे पंजाबमधील एक मातब्बर नेते अमरिंदर सिंग यांनी अखेर मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाची स्थापना केली. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ७ पानांचे पत्र पाठवले असून या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी मैत्री दाखवली व त्यांची गळाभेट घेतली, यावर अमरिंदर सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्या पत्रात सोनिया गांधी व त्यांची दोन मुले राहुल व प्रियंका यांच्या व्यवहारामुळेही दुःख झाल्याचे म्हटले आहे. तुमच्या मुलांना मी माझीही मुले समजतो. त्यांच्या वडिलांना १९५४ पासून ओळखत होतो, असे म्हटले आहे. पण देश व राज्याच्या हितासाठी आपण काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0