गेल्या वर्षात भारताची ऑक्सिजनची दुप्पट निर्यात

गेल्या वर्षात भारताची ऑक्सिजनची दुप्पट निर्यात

नवी दिल्लीः २०२०-२१ या वर्षांच्या पहिल्या १० महिन्यात भारताने जगातील अनेक देशांना दुपटीहून अधिक ऑक्सिजन विकल्याची माहिती पुढे आली आहे. बिजनेस टुडेने व

राणी एलिझाबेथचा मृत्यूसोहळा
चौफेर टीकेनंतर ‘राष्ट्रीय गो-विज्ञान परीक्षा’ स्थगित
आधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला

नवी दिल्लीः २०२०-२१ या वर्षांच्या पहिल्या १० महिन्यात भारताने जगातील अनेक देशांना दुपटीहून अधिक ऑक्सिजन विकल्याची माहिती पुढे आली आहे. बिजनेस टुडेने वाणिज्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वृत्त दिले आहे.

सध्या भारताला ऑक्सिजनची तीव्र टंचाई भासत आहे.

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात भारताने ९३०१ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली, त्यातून ८.९ कोटी रु.चा महसूल मिळाला. त्या अगोदर २०१९-२० या वर्षांत भारताने ४,५१४ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली, त्यातून ५.५ कोटी रु.चा महसूल मिळाला होता.

सध्या जे कोरोना संक्रमित रुग्ण अत्यवस्थ असतात त्यांना ऑक्सिजनची गरज असते, भारतात कोरोनाची दुसरी महालाट आल्यानंतर देशभर ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शहरात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने हालचाली झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला ऑक्सिजनच्या टंचाईवरून ताशेरे मारले. राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती देशभर दिसत असताना तुम्हाला मानवी जीवनाची काळजी नाही, अशी टिप्पण्णी न्यायालयाने केली होती. ऑक्सिजनची आयात होत नाही तोपर्यंत पोलाद व पेट्रोलियम उद्योगाला लागणार्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी करून तो रुग्णालयात द्यावा असे म्हटले होते.

महाराष्ट्रातही ऑक्सिजनची तीव्र टंचाई पसरल्याने रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हात जोडायला तयार आहे पण केंद्राने आम्हाला ऑक्सिजन द्यावा अशी मागणी गुरुवारी केली होती.

उ. प्रदेश, म. प्रदेश, गुजरात व अन्य राज्यांनाही ऑक्सिजनची टंचाई तीव्र स्वरुपात जाणवत आहे.

दरम्यान बिजनेस टुडेचे हे वृत्त मनीकंट्रोल वेबसाइटवर आले होते पण ते त्यांनी नंतर हटवले आहे. न्यूजलाँड्रीच्या मते हे वृत्त २१ एप्रिललाच वेबसाइटवरून हटवण्यात आले असून अशा वृत्तामुळे अनावश्यक भीती समाजात पसरत असून भारताच्या ऑक्सिजन निर्यातीबाबत भ्रामक चित्र निर्माण होते व असे वृत्त प्रकाशित केले जाऊ नये असा खुलासा आहे.

मनीकंट्रोल नेटवर्क-18या समूहाची असून त्याची मालकी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: