कोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध?- अमित शहा

कोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध?- अमित शहा

नवी दिल्लीः ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत त्या राज्या

चिदंबरम यांची तिहारमध्ये रवानगी
युरोपियन युनियनचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लक्ष
काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला

नवी दिल्लीः ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे सांगत निवडणुका व कोरोनाचे संक्रमण यांच्यात संबंध लावणे योग्य ठरणार नाही, असे विधान केले आहे.

देशात घाईगडबडीने लॉकडाउन पुकारण्याची गरज नाही हे सरकार आपली पूर्ण ताकत लावून कोरोनाविरोधातील युद्ध जिंकेल असाही दावा त्यांनी व्यक्त केला.

कोरोना व निवडणुका प्रचार यांचा संबंध स्पष्ट करत अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका कुठे आहेत? पण तेथे ६० हजार केसेस आहेत. इथे ४ हजार आहेत. महाराष्ट्राविषयी मला अनुकंपा आहे पण याचा संबंध निवडणुकांशी लावणे अयोग्य ठरेल. ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत तेथे कोरोनाची रुग्ण संख्या वाढली आहे, यावर तुम्ही काय म्हणाल, असा सवाल त्यांनी केला.

कोरोनासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोपही अमित शहा यांनी फेटाळला. सरकारच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन बैठका झाल्या आहेत आणि या बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो. लसीकरणाबाबत अनेक वैज्ञानिकांशी चर्चा झाल्या आहेत, सरकार आपल्या पूर्ण क्षमतेनुसार कोरोनाची लढाई लढत असल्याचा दावा त्यांनी केला.

कोरोना लसीच्या टंचाईवर शहा म्हणाले, जगातील सर्वाधिक वेग असलेला भारतातील लसीकरण मोहीम असून पहिल्या १० दिवसांत भारतात सर्वाधिक लसीकरण झाले. पहिल्या लसीचा खुराक दिल्यानंतर त्यानंतर खूप दिवसानंतर दुसरा खुराक दिला जातो, त्यामुळे लसीकरणाला वेग येत नाही. पण त्याचा अर्थ लसीची टंचाई आहे, असा होत नाही, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी प्रचार थांबवला

दरम्यान कोरोना महासाथीची दुसरी लाट संपूर्ण देशाला कवेत घेत असताना खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प. बंगालमधील उर्वरित टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार आपण थांबवत असल्याचे रविवारी जाहीर केले. राजकीय पक्षांच्या निवडणुकांच्या प्रचार सभेत हजारोंनी गर्दी होत असल्याने कोरोनाची साथ वेगाने पसरत असल्याची भावना देशवासियांमध्ये पसरत असताना राहुल गांधी यांनी आपला हा निर्णय घेतला. राहुल गांधी यांनी अन्य पक्षाच्या नेत्यांनाही प्रचार सभा घेऊ नये असे आवाहन केले आहे.

दुसरीकडे प. बंगालमधील निवडणुकांच्या उर्वरित फेर्या रद्द करून एकाच फेरीत मतदान घ्यावे, अशी मागणी तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली होती. ती मागणी निवडणुक आयोगाने फेटाळली. पण आयोगाने संध्याकाळी ७ ते सकाळी १० पर्यंतच्या प्रचारांवर बंदी घातली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: