गौतम नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले

गौतम नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले

नवी दिल्ली : भीमा-कोरेगांव प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अरुण मिश्रा व न्या. एम.आर. शहा यांच्या पीठाने सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत गौ

लोकशाहीत, जातीमागचा तो ‘कास्ट कोड’ तसाच आहे!
आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला
४९ मान्यवरांवरचे देशद्रोहाचे गुन्हे रद्द

नवी दिल्ली : भीमा-कोरेगांव प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अरुण मिश्रा व न्या. एम.आर. शहा यांच्या पीठाने सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले. या दोघांनी येत्या तीन आठवड्यात पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे, असेही न्यायालयाने आदेश दिले.

गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे यांच्यावर यूएपीए अंतर्गत भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार फैलावल्याचा आरोप असून या दोघांनी अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सोमवारी न्यायालयाने या दोघांवर पोलिसांनी लावलेले आरोप प्राथमिकदृष्ट्या योग्य वाटतात असे म्हणत या दोघांना आत्मसमर्पण करण्यास सांगत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: