माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दुपारी एम्स रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार, जेटली यांचे दुपारी १२ वा

जेटलींची राजीव गांधीना क्लीन चीट !
माध्यमांनी जेटलींच्या आरोग्याची बातमी का लपवली?
मोदी सरकार तुमच्यावर पाळत ठेवतंय का? मग हे पाच प्रश्न नक्की विचारा.

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दुपारी एम्स रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार, जेटली यांचे दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी संगीता, मुलगी सोनाली आणि मुलगा रोहन आहे.

वकील असणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जेटली, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या (१९९९) सरकारमध्ये मंत्री होते. ‘रालोआ’च्या दुसऱ्या (२०१४) नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री आणि संरक्षण ही खाती सांभाळली होती.

गेल्या १ वर्षापासून ते आजारी होते. २०१८ मध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. नुकतेच त्यांना कर्करोगाचे (सॉफ्ट टिश्यू) निदान झाले होते, त्यामुळे याच वर्षी ते पदापासून दूर झाले होते आणि त्यांनी अर्थसंकल्प सादर केला नव्हता.

९ ऑगस्ट रोजी श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये अतिशय महत्त्वाचे मंत्री असणारे जेटली, हे सरकारच्या अडचणी सोडविणारे म्हणून पुढे आले होते. ‘वस्तू आणि सेवा करा’(जीएसटी)साठी त्यांनी राज्यांमध्ये समन्वय आणि मतैक्य घडविणारे आणि दिवाळखोरी कायदा मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले होते.

विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: