कोविडच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये ७० लाख बेरोजगार

कोविडच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये ७० लाख बेरोजगार

नवी दिल्लीः कोविड-१९च्या दुसर्या लाटेत एप्रिल महिन्यातच देशात बेरोजगारीची टक्केवारी ८ टक्क्याने वाढली असून एकाच महिन्यात सुमारे ७० लाख जणांवर बेरोजगार

भीमा-कोरेगाव प्रकरण एनआयएकडे सोपवणार नाही – मुख्यमंत्री
रोजगार देण्यात ‘असीम’ अपयशी
“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल

नवी दिल्लीः कोविड-१९च्या दुसर्या लाटेत एप्रिल महिन्यातच देशात बेरोजगारीची टक्केवारी ८ टक्क्याने वाढली असून एकाच महिन्यात सुमारे ७० लाख जणांवर बेरोजगारीची कुर्हाड पडल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ६.८९ टक्के होती ती टक्केवारी मार्चमध्ये ६.५ होती नंतर एप्रिलमध्ये ती वाढून ७.९७ टक्के झाली. शहरी भागातील बेरोजगारीची टक्केवारी मार्चमध्ये ७.२७ टक्के होती ती एप्रिलमध्ये वाढून ९.७८ टक्क्यांवर गेली. परिणामी ७३ लाख ५० हजार जणांवर बेरोजगारीची वेळ आल्याचे सीएमआयईचे म्हणणे आहे.

जानेवारी महिन्यात देशात नोकरदार वर्गाची संख्या ४० कोटी ७ लाख होती. ती एप्रिलमध्ये घसरून ३९ लाख ८ लाखांवर आली आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार रोजगार दरातही घट झाली आहे.  एप्रिलमध्ये रोजगार दर ३६.७० टक्के तर मार्चमध्ये ३७.५६ टक्के इतका होता. गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाच्या काळात देशातील कोट्यवधी नागरिकांच्या नोकर्या गेल्या असून अनेक जणांना अद्याप रोजगार अथवा नोकर्या मिळालेल्या नाहीत. मार्चमध्ये अशा जणांची संख्या १ कोटी ६० लाख होती ती एप्रिलमध्ये वाढून १ कोटी ९४ लाख झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0