जेलमध्येच आसारामचा महिमा सांगणारा कार्यक्रम

जेलमध्येच आसारामचा महिमा सांगणारा कार्यक्रम

लखनौः बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला स्वयंभू संत आसाराम बापू याचा महिमा सांगणारा एक कार्यक्रम तुरुंगातच आयोजित केल्याबद्दल उ. प्रदेशातल्या शा

कोरोनाविरोधातल्या लढाईचा हा ‘गोल्डन अवर’- मुख्यमंत्री
सरन्यायाधीशांवर आरोप करणारी महिलाही पीगॅससच्या रडारवर
दक्षिण चीन सागरात संघर्षाच्या ठिणग्या

लखनौः बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला स्वयंभू संत आसाराम बापू याचा महिमा सांगणारा एक कार्यक्रम तुरुंगातच आयोजित केल्याबद्दल उ. प्रदेशातल्या शाहजहांपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक, तुरुंग अधिकारी व अन्य ६ कर्मचारी दोषी आढळले आहे. हा कार्यक्रम गेल्या २१ डिसेंबर रोजी झाला होता. आसाराम बापू याच्या लखनौतील तीन अनुयायी या कार्यक्रमासाठी खास शाहजहांपूर कारागृहात आले होते. त्यांनी कारागृहात आसाराम बापू याचा एक फोटो लावला होता व कैद्यांना घोंगडे व प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली व चौकशीचे आदेश सरकारने दिले.

या संदर्भात तुरुंग अधिक्षक राकेश कुमार, तुरुंग निरीक्षक राजेश कुमार, व ४ वॉर्डन यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात आसाराम प्रकरणात त्यांच्याविरोधात साक्ष देणारे कृपालसिंह यांचा खून करणारे व सध्या जामीनावर असलेले नारायण पांडे व अर्जुन हे दोघे उपस्थित असल्याची चर्चा सुरू होती पण कारागृह प्रशासनाने हे दोघे घटनास्थळी उपस्थित नव्हते असे स्पष्ट केले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात आसाराम बापू सध्या राजस्थानमध्ये जोधपूर येथे तुरुंगात आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0