केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

जयपूरः राजस्थानमध्ये राजकीय पेचप्रसंग चिघळला आहे. गुरुवारी रात्री उशीरा तीन ऑडिओ टेप बाहेर आल्या. यात बंडखोर आमदार सचिन पायलट यांच्या गटातले भंवरलाल श

आरक्षण, भागवत आणि संघ
‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’
शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय !

जयपूरः राजस्थानमध्ये राजकीय पेचप्रसंग चिघळला आहे. गुरुवारी रात्री उशीरा तीन ऑडिओ टेप बाहेर आल्या. यात बंडखोर आमदार सचिन पायलट यांच्या गटातले भंवरलाल शर्मा व विश्वेंद्र सिंह हे दोन आमदार भाजपचे खासदार व केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंग शेखावत, भाजपचे एक नेते संजय जैन व अन्य एका मध्यस्थाशी बोलत असून या संभाषणात राजस्थानमधील गेहलोत सरकार कसे पाडले जाईल याची चर्चा सुरू आहे. ‘द वायर’ या ऑडिओ टेपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

पण ही ऑडिओ टेप बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे चीफ व्हीप महेश जोशी यांनी स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडे (एसओजी) शेखावत, शर्मा व जैन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून जैन यांना अटक केली असून शेखावत यांनी मात्र या ऑडिओ टेपमध्ये आपला आवाज नसल्याचा दावा करत कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे.

काँग्रेसने आपले आमदार भंवरलाल शर्मा व पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंग यांची पक्षसदस्यता निलंबित केली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

शुक्रवारी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी फेअरमाउंट हॉटेलच्या बाहेर एक पत्रकार परिषद घेऊन भाजप काँग्रेसचे आमदार २५-३५ कोटी रु.ला विकत घेत असल्याचा आरोप केला. हा घोडेबाजार ऑडिओ टेपमधून स्पष्टपणे कळत असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण देश कोविड-१९च्या विरोधात लढत असताना भाजप मात्र राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यात व्यस्त असल्याचीही टीका त्यांनी केली.

त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी गेहलोत सरकार खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. अशा खोट्या टेप प्रसिद्ध करून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आपल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करत असल्याचेही ते म्हणाले.

ऑडिओ टेपमध्ये काय आहे?

एका टेपमध्ये भंवरलाल शर्मा, शेखावत यांच्याशी मारवाडी भाषेत बोलत असून ३० आमदारांचा गट सरकारविरोधात असल्याचे ते सांगत आहेत. त्यावर गेहलोत सरकार या संख्येमुळे पडेल, या आमदारांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत हॉटेलमधून बाहेर पडून नये  असे शेखावत उत्तर देतात.

शर्मा या बदल्यात आपण ज्येष्ठ असल्याने मोठी किंमत शेखावत यांच्याकडे मागतात.

दुसर्या टेपमध्ये भंवरलाल शर्मा हे पायलट यांना समर्थन देणार्या आमदारांना पैशाचा पहिला हप्ता मिळाल्याचे सांगताना आढळतात.

या टेप व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतस्रा यांनी ट्विटरवरून शेखावत यांच्यावर हल्ला केला. काल भाजपचे नेते देशभक्तीची चर्चा करताना दिसत होते दुसर्या दिवशी ते लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार कट कारस्थानाद्वारे पाडत असून आपल्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी (शेखावत) राजीनामा द्यावा, अशी मागणी दोतस्रा यांनी केली आहे.

गेहलोत यांच्या प्रसार माध्यम सल्लागारांनी एक पत्रक प्रसिद्ध करून भंवरलाल शर्मा यांनी पूर्वी भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आता त्यांनी सचिन पायलट यांच्याशी संधान साधल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले होते.

राजस्थानच्या मुख्यमंत्री भाजपचे भैरोसिंग शेखावत असतानाचा एका घटनेचा दाखला या पत्रात दिला असून भैरोसिंग शेखावत हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेस गेले असताना भंवरलाल शर्मा यांनी गेहलोत यांची भेट घेऊन भाजपचे सरकार पाडण्याची योजना त्यांना सांगितली होती. पण गेहलोत यांनी या कटकारस्थानात आपण सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी गेहलोत हे केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री व राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी भाजपचे सरकार पाडणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची भूमिका घेतली होती. या दरम्यान गेहलोत यांनी तत्कालिन राज्यपाल बळीराम भगत व पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेऊन काँग्रेस असले सरकार पाडण्याचे उद्योग करणार नसल्याचे त्यांना सांगितले होते.

‘बंडखोर आमदारांवर कारवाई नको’

दरम्यान राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. या संदर्भातील सुनावणी आता सोमवारी सकाळी १० वाजता होणार आहे.

गेहलोत सरकारने बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट व अन्य १८ आमदारांना निलंबनाची नोटीस देत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर हे बंडखोर आमदार न्यायालयात गेले आहेत.

काँग्रेसचे चीफ व्हीप महेश जोशी यांनी विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना १८ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची नोटीस पाठवली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: