आसाम: सरकारी अनुदानित मदरसे, संस्कृत शाळा बंद

आसाम: सरकारी अनुदानित मदरसे, संस्कृत शाळा बंद

गुवाहाटी - आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदतीवरचे सर्व मदरसे व संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील अधिसूचना येत्या

संकटकाळी महिलांचाच जातो बळी
हिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन!
सैयद गिलानी हुर्रियतमधून बाहेर

गुवाहाटी – आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदतीवरचे सर्व मदरसे व संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील अधिसूचना येत्या नोव्हेंबरमध्ये काढण्यात येईल, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सांगितले. पण खासगी मदरसे व संस्कृत शाळा मात्र चालू राहणार आहेत.

समरसता आणण्यासाठी कुराणवर सरकारी खर्च करण्यास परवानगी देता येत नाही. मदरशात शिकणार्या बहुतांश मुलांना डॉक्टर व इंजिनियर होण्याची इच्छा असते. मदरसे ही काही नियमित शाळा नसते आणि हे मुलांना माहिती नसते, त्यामुळे सरकारच्या अनुदानावर सुरू असलेल्या मदरशांचे उच्च माध्यमिक शाळांमध्ये रुपांतर केले जाईल वा ते बंद केले जातील आणि त्यात शिकणार्या विद्यार्थ्यांना तेथे नियमित विद्यार्थी म्हणून दाखले देण्यात येतील, असे शर्मा यांनी सांगितले. मदरसे ही स्वातंत्र्याच्या आधीची पद्धत होती व तो मुस्लिम लीगचा वारसा होता. आता सरकारने राज्यातल्या सर्व मदरशांची चौकशी केल्यानंतर ते बंद करण्याचा निर्णय घेतला असे शर्मा यांनी सांगितले.

संस्कृत शाळांबद्दल शर्मा म्हणाले, या शाळांना कुमार भास्करवर्मा संस्कृत विश्वविद्यापीठाकडे सोपवून तेथे शैक्षणिक व अध्ययन केंद्रे तयार केली जातील. या शिक्षण व अध्ययन केंद्रात भारतीय संस्कृती, परंपरा, राष्ट्रवादाचे शिक्षण जाईल. या संस्कृत शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना आसाम माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेता यावा म्हणून हा निर्णय घेतला आहे.

आसाममध्ये सध्या सरकारी अनुदानावर ६१० मदरसे चालवले जात असून त्यावर दरवर्षी २६० कोटी रु. खर्च होतात. तर राज्यात १ हजार संस्कृत शाळा असून त्यातील १०० शाळांना वार्षिक १ कोटी रु.चे अनुदान सरकार देत असते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: