आसाममध्ये भाजीविक्रेत्याचा झुंडबळी

आसाममध्ये भाजीविक्रेत्याचा झुंडबळी

गुवाहाटी : आसाममधील कामरूप जिल्ह्यात एका भाजी विक्रेत्याला पाच जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ठार मारले. पोलिसांनी या प्रकरणी फैजुर हक और युसूफुद्

पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी
रोजगार नसल्याने पित्याकडून नवजात मुलीची विक्री
मणिपूर दहशतवादी हल्ल्यात कुटुंबासह कर्नल ठार

गुवाहाटी : आसाममधील कामरूप जिल्ह्यात एका भाजी विक्रेत्याला पाच जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ठार मारले. पोलिसांनी या प्रकरणी फैजुर हक और युसूफुद्दीन अहमद या दोन आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहेत.

स्थानिक वृत्तानुसार भाजी विक्रेता सनातन डेका मंडईतून सायकलवरून घरी येत असताना त्याच्या सायकलची एका कारला धडक बसली. या प्रकरणावरून कारमध्ये असलेले जलील अली, साबीर अली यांनी डेका यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर या दोघांच्या मदतीला अन्य तिघेजण आले आणि या पाचही जणांनी पुन्हा डेका यांना मारहाण केली.

हे भांडण सोडवण्यासाठी गावातील काही लोक आले असता हे पाचही जण पळून गेले. त्यानंतर अत्यंत जखमी अवस्थेतल्या डेका यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे त्यांचा मृत्यू झाला.

सनातन डेका हा टेटेलिया या गावांत राहात होता. तो पूर्वी फॅक्टरीत काम करायचा. पण लॉकडाऊन पुकारल्यानंतर त्याची नोकरी गेली, त्यामुळे त्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून रविवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे तर अन्य तिघेजण बेपत्ता आहेत.

या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘द ऑर्गनायजरने आपल्या वेबसाइटवर ही घटना इस्लामी झुंडशाही असल्याचा आरोप केला आहे. धर्माने हिंदू असलेला डेका रमझानच्या काळात भाजी विकत असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला असे या मुखपत्राचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी या प्रकरणात असे काही दिसत नसल्याचे स्पष्ट केले.

दोन वर्षांपूर्वी आसाममधल्याच कर्बी आंगलांग जिल्ह्यात एका जमावाने दोन युवकांना जबर मारहाण करत त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन गेल्या फेब्रुवारी गोहाटी उच्च न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: