ऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी

ऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी

नवी दिल्लीः अस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या ‘कोविडशील्ड’ या कोरोना विषाणूवरील लसीचा सार्वजनिक वापर करण्यास हरकत नसल्याचा शिफारस

कोरोना – छोट्या देशांचे मोठे धडे
कोरोना मदतीत भेदभाव नको, संयम हवा : सरसंघचालक
मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू

नवी दिल्लीः अस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या ‘कोविडशील्ड’ या कोरोना विषाणूवरील लसीचा सार्वजनिक वापर करण्यास हरकत नसल्याचा शिफारस अहवाल तज्ज्ञ समितीने सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला दिल्याचे वृत्त आहे. या शिफारशीमुळे कोरोनाने बाधित असलेल्या अमेरिकेनंतर जगातल्या दुसर्या क्रमाकांच्या भारतामध्ये आता लसीकरण सुरू होईल. अमेरिकेत अगोदरच कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. ब्रिटन व अर्जेंटिनाने त्यांच्याकडे विकसित झालेल्या लसीला मान्यता दिली आहे. अस्ट्राझेनेका कंपनीचा करार पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटशी झाला आहे. या संस्थेकडून भारतात कोविडशील्डची निर्मिती केली जाणार आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी मात्र अद्याप या शिफारस अहवालावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. सीरमने आम्ही सरकारकडून अधिकृत मंजुरीची वाट पाहात असल्याचे सांगितले.

गेल्या बुधवारी ब्रिटनच्या सरकारने अस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या कोविड लसीला परवानगी दिली होती. त्यानंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विशेष तज्ज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूटच्या अर्जावर विचार केला. या अर्जावर दोन वेळा समितीमध्ये चर्चा झाली होती. या समितीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या मंजुरी अर्जावरही विचार विनिमय केला. पण यावर अंतिम निर्णय झाला नाही.

अस्ट्राझेनेका लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करण्यात आले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटकडून ही लसनिर्मिती भारतात होणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारपासून प्रत्येक राज्यात शीतगृहात ही लस पाठवण्याचे काम सुरू होणार आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या लसींना लवकरच मंजुरी मिळेल असे एका सूत्राने सांगितले तर फायझर कंपनीने आपल्या लसीची माहिती सादर करण्यासाठी काही वेळ लागेल असे सरकारला सांगितले आहेत. फायझर आपली लस जर्मन कंपनी बायोनटेकच्या मदतीने विकसित करत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: