अयोध्येच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद

अयोध्येच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद

अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिला. त्या पार्श्वभूमीवर ठिकठीकाणी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती

काश्मीरातील भूसंपादनाचा निर्णय लष्कराकडे
देशात एकाच दिवशी ३८६ कोरोना रुग्ण आढळले
पोलिस व राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट युतीचे दुबेला संरक्षण

अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिला. त्या पार्श्वभूमीवर ठिकठीकाणी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उत्तर प्रदेशमध्ये मोठी खबरदारी घेण्यात आली होती. आग्रा आणि अलीगड येथील विभागीय आयुक्तांनी २४ तासांसाठी इंटरनेट बंद केल्याची घोषणा केली. यामध्ये मोबाईल फोनवरील इंटरनेट सेवा, तसेच सोशल मिडिया, व्हॉटसअप आणि फेसबुक, ट्वीटर यांचा समावेश आहे.

राजस्थानमध्ये काही भागामध्येही इंटरनेट बंद करण्यात आले आहे. जयपूर, सिकर, दौसा या भागांचा या बंदमध्ये सहभाग आहे. या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून इंतनेट बंद करण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर लक्ष ठेवले जात आहे. जे व्हॉटसअप ग्रुप नेहमी द्वेष पसरविण्याचे काम करतात, ते शोधून बंद करण्यात आले आहेत. जे द्वेष पसरविणारे संदेश पाठवतील, त्यांच्याविरोधात त्वरीत कारवाई केली जाईल, असे जयपूरचेपोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी इंडिया टुडेला सांगितले.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मीरत, सहारणपूर अशा संवेदनशील भागामध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले असून, काही ठिकाणी तात्पुरते तुरुंग उभारण्यात आले आहेत.

मुंबईमध्येही कलम १४४ लागू करण्यात आले असून, अतिरिक्त ४० हजारांचे पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0