अयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी

अयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा अशी विनंती देशातील अनेक मान्यवर, विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. त्या संदर्भातले स्वाक्षऱ्यांचे पत्र या मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे.

या पत्रात आपली भूमिका विशद करताना या मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडणे हा गुन्हा असल्याचे स्पष्टपणे नमूद केल्याचा उल्लेख करत ही मशीद पाडली नसती तर असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला गेला नसता या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मशीद पाडल्यानंतर भारतीय पुरातत्व खात्याने वादग्रस्त जागेखाली हिंदू मंदिर शोधण्यासाठी उत्खनन केले होते. पण या उत्खननात पुरातत्व खात्याला बाबरी मशिदीच्या जागीच रामाचा जन्म झाला किंवा त्याजागी हिंदू मंदिर होते असा ठाम दावा करता आलेला नाही. त्याचबरोबर मुघल काळात व नंतर नवाबी काळात वादग्रस्त जागी नमाज पठण करण्यास मुसलमानांना बंदी घालण्यात आली नव्हती शिवाय अयोध्येत राम जन्मास आला ही हिंदूंची श्रद्धा होती पण वादग्रस्त जागा हीच रामाची जन्मभूमी होती असा ठाम समज त्याकाळात हिंदूंचा नव्हता, हेही न्यायालयात सिद्ध झालेले नाही, असे या मान्यवरांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात वादग्रस्त जागा हिंदू पक्षकारांना देऊन तेथे केंद्राने राम मंदिर उभे करावे असे सांगितले आहे. याचा अर्थ असा की केंद्राने हिंदूंचे हित पाहावे. त्यामुळे न्यायालयाने असे सूचित करणे हा देशाच्या धर्मनिरपेक्ष घटनेशी प्रतारणा ठरते, असे मत या विनंती पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

या विनंती पत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :

अबन रझा, अचिन विनायक, अहमद रझा, आलोक जैन, आनंद के सहाय, एंजली मुलतानी, अनिल भट्टी, अनिल चंद्र, अंतरा देव सेन, अर्चना प्रसाद, अशोक राव, अस्ताद डाबू, आयशा किडवई, बद्री रैना, सी. पी. भांबरी, सी.पी.चंद्रशेखर, चंचल चौहान, चिराश्री दास गुप्ता, डी.एन.झा, दीपक सनन, धीरेंद्र के झा, दिनेश अबोल, दुनु रॉय, गार्गी चक्रवर्ती, गीता कपूर, गीता हरिहरन, इंदिरा अर्जुन देव, इंदिरा चंद्रशेखर, इरफान हबीब, इशरत आलम, जयती घोष, एम. श्रीमाली, कौसर विझरत, कविता सिंग, केवल अरोरा, कुमार शहानी, लता सिंग, लिमा कानुंगो, एम.के.रैना, मदनगोपाल सिंग, मधु प्रसाद, मधुश्री दत्ता, मनिनी चटर्जी, माया कृष्ण राव, मिहिर भट्टाचार्य, एमएमपी सिंग, मोहनराव, मोहम्मद अबुझर, मुकुल दुबे, एन.के.शर्मा, नदीम रिझावी, नासिर तैयबजी, निखिल कुमार, नीना राव, पामेला फिलिपोस, पार्थिव शाह, प्रभात पटनायक, प्रभात शुक्ला, प्रदीप सक्सेना, प्रशांत मुखर्जी, प्रवीण झा, पुनीत निकोलस यादव, राधिका मेनन, राधिका सिंघा, राहुल रॉय, राजेंद्र शर्मा, राजिंदर अरोरा, रजनी बी अरोरा, राखी सहगल, राम रहमान, रमेश दीक्षित, रमेश रावत, रंजनी मजुमदार, रेखा अवस्थी, रिमली भट्टाचार्य, रॉजर अलेक्झांडर, रोहित आझाद, एस के पांडे, सादिक जफर, शक्ती काक, शर्मिला सामंत, शेरना दस्तूर, शिरीन मौसवी, सिधिक कप्पन, स्मिता गुप्ता, सोहेल हाश्मी, सुधन्वा देशपांडे, सुधीरचंद्र, सुकुमार मुरलीधरन, सुमंगला दामोदरां, सुप्रिया वर्मा, स्वाती जोशी, उत्सव पटनायक, वाले सिंह, वंदना राग, वनिता नायक, विजया वेंकटरमन, विकास रावळ, विश्वमोहन झा, विवन सुंदरम्, वजाहत हबीबुल्ला, झोया हसन

मूळ बातमी

COMMENTS