कोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली

कोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली

नवी दिल्ली : चीनमध्ये उद्रेक झालेला कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी उपचार केल्याने ते बरे होतील अशा सूचना बुधवा

‘मोदींनी ठरवलीय पाक-चीनशी युद्धाची तारीख’
तैवानचे कोरोना नियंत्रण
विधाने जपून कराः डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : चीनमध्ये उद्रेक झालेला कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी उपचार केल्याने ते बरे होतील अशा सूचना बुधवारी आयुष मंत्रालयाने दिल्या. आयुष मंत्रालयाच्या या सूचनेवर सोशल मीडियात सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. कोरोनावर जगभरात कुठेही औषध नसताना व ज्या देशात- चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे तेथेही औषध नसताना सरकार आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी औषधांची यादी देत असल्याबद्दल नेटकऱ्यांनी सरकावर टीका केली आहे.

बुधवारी आयुष मंत्रालयाने कोरोना संदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीत सेंट्रल कौंन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीचे मंडळ होते. ही बैठक संपल्यानंतर आयुष मंत्रालयाने एक आरोग्य सल्लापत्रक जारी केले. या सल्लापत्रकात अर्सेनिक अल्बम ३० हे होमोपॅथी रिकाम्या पोटी सलग तीन दिवस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर एक महिन्याने या औषधाचा डोस पुन्हा घ्यावा व त्याने संसर्ग टाळता येईल असे या पत्रकात म्हटले आहे.

या सल्लापत्रकात स्वत:ला या विषाणूची लागण होऊ नये म्हणून जेवणाअगोदर २० सेकंद हात स्वच्छ धुणे, डोळा, नाक, तोंड यांना अस्वच्छ हातांचा स्पर्श न करणे, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे टाळणे असेही प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत. त्याचबरोबर मंत्रालयाने शिंका, खोकला आला असल्यास त्यावाटे संसर्ग पसरू नये म्हणून रुमाल वापरण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता वाटल्यास तोंडावर मास्क लावावा व लगेचच इस्पितळात जाऊन तपासणी करून घ्यावी असेही या सल्लापत्रकात म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना विषाणूमुळे साधी सर्दी ते ‘मीडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ व ‘सार्स’ हे आजार होऊ शकतात असे म्हटले आहे. सध्या सापडलेले कोरोना विषाणू माणसामध्ये पहिल्यांदाच आढळले असून त्यांचा संसर्ग प्राण्यांपासून झाला आहे. त्यावर वैद्यकीय उपाय शोधले जात आहेत असे संघटनेने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: