द. आफ्रिकेतील कोरोनाचा नवा विषाणू प्रकार धोकादायक

द. आफ्रिकेतील कोरोनाचा नवा विषाणू प्रकार धोकादायक

दक्षिण आफ्रिकेत पसरलेला कोरोना विषाणूचा ‘B.1.1.529’ हा नवा प्रकार (व्हेरिएंट) अधिक धोकादायक असून सद्यस्थितीतल्या लसी त्यावर निष्फळ ठरू शकतात असे ब्रिट

नाताळ साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना
कोविडमुळे कोलमडलेले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट
गुजरातमधील अतिरिक्त मृत्यूंची कथा

दक्षिण आफ्रिकेत पसरलेला कोरोना विषाणूचा ‘B.1.1.529’ हा नवा प्रकार (व्हेरिएंट) अधिक धोकादायक असून सद्यस्थितीतल्या लसी त्यावर निष्फळ ठरू शकतात असे ब्रिटनच्या आरोग्य खात्यातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे ब्रिटनने द. आफ्रिका, नामिबिया, बोटस्वाना, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वाटिनी येथून येणार्या विमान उड्डाणांना बंदी घातली आहे. ब्रिटनचे वाहतूक मंत्री ग्रांट शॅप्स यांनी या नव्या विषाणूविरोधात सतर्क राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. भारतानेही या संदर्भात कठोर पावले उचलेली आहेत. भारत सरकारने द. आफ्रिकेतून येणार्या प्रवाशांची कठोर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रिटनच्या आरोग्य खात्यानुसार कोरोना-१९ विषाणूत ‘B.1.1.529’ हा बदल झालेला नवा विषाणू ब्रिटनमध्ये अद्याप आढळलेला नाही पण तो द. आफ्रिका, नामिबिया, बोटस्वाना, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वाटिनी येथे आढळला आहे. या विषाणूचे संक्रमण वेगाने असल्याने त्यातून रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे विकसित होण्याची शक्यता अधिक आहे. या नव्या विषाणूमध्ये अणुकुचीदार प्रोटीन आढळले असून या नव्या विषाणूच्या प्रकाराची अधिक माहिती मिळालेली नाही पण या विषाणू प्रकारापासून सावध राहिले पाहिजे, असे ब्रिटनचे म्हणणे आहे. या नव्या विषाणूमध्ये ५० प्रकारचे म्युटेशन्स दिसून आले आहेत. हा विषाणू प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळा आहे, असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. या नव्या विषाणूचे दोन रुग्ण हाँग काँग व बोटस्वानामध्ये आढळले आहेत. पण ब्रिटनमध्ये असे रुग्ण आढळलेले नाहीत.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने ‘B.1.1.529’ या नव्या बदल झालेल्या कोरोना-१९ विषाणूची दखल घेतली असून त्याचे नामकरण करण्याविषयी शुक्रवारी चर्चा सुरू होती. या विषाणूचा अधिक अभ्यास केला जाईल व त्यानंतर त्याचे परिणाम लक्षात येतील असे जागतिक आरोग्य संघटनेचे साथरोगतज्ज्ञ मारिया व्हॅन कर्कव्होह यांनी ट्विट केले आहे.

द. आफ्रिकेत व आफ्रिकेतील अन्य काही देशांत कोरोनाचा ‘B.1.1.529’ हा नवा विषाणू प्रकार आढळल्यानंतर युरोपिय महासंघाने या देशांतून येणार्या सर्व विमान उड्डाणांना स्थगिती दिली आहे. इटलीने द. आफ्रिकेतून येणार्या प्रवाशांना पुढील १४ दिवस बंदी घातली आहे. सिंगापूरनेही द. आफ्रिकेतून येणार्या प्रवाशांना बंदी घातली आहे. जर्मनीने द. आफ्रिकेला ‘व्हायरस व्हेरिएंट एरिया’ म्हणून घोषित केले आहे. जपानने द. आफ्रिकेसह अन्य ५ आफ्रिकी देशांना विमान बंदी घातली आहे.

युरोपमध्ये सध्या कोरोना प्रतिबंधित बुस्टर डोस मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात असून दोन लसी मिळालेल्या नागरिकांना बुस्टर डोस मिळण्यासाठी आरोग्य प्रणाली सक्रीय झालेली आहे.

युरोप व अमेरिकेत हिवाळ्याचे आगमन झाल्याने व ख्रिसमसची तयारी सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे, या गर्दीमुळे कोरोनाची लागण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर्मनीत सध्या कोरोनाचे ७६ हजार रुग्ण असून वेळप्रसंगी लष्कराची मदत घेतली जात आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: