आता धास्ती ‘बी वन वन सेव्हन’ची!

आता धास्ती ‘बी वन वन सेव्हन’ची!

सप्टेंबर २०१९ आणि सप्टेंबर २०२० चा अर्थाअर्थी काही संबंध असू शकेल का? पण तो एका घटनेबाबत कायम आहे. आणि ही घटना म्हणजे कोरोना. सप्टेंबर २०१९ मध्ये चीनम

अखेर युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर
जीडीपीचा अन्वयार्थ: म्हणे, भारताने इंग्लंडला मागे सारले
ब्रिटनमधून आलेले ५ भारतीय कोरोना पॉझिटीव्ह

सप्टेंबर २०१९ आणि सप्टेंबर २०२० चा अर्थाअर्थी काही संबंध असू शकेल का? पण तो एका घटनेबाबत कायम आहे. आणि ही घटना म्हणजे कोरोना. सप्टेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान येथून एक अदृश्य विषाणू जन्माला आला आणि त्याने सर्व जगाला आपल्या कवेत घेतले. आणि तब्बल वर्षानंतर सप्टेंबर २०२० मध्ये याच विषाणूचा जुळा पण थोडा शक्तीशाली भाऊ ग्रेट ब्रिटनच्या लंडन या शहरात सापडला. आणि आता तो सर्व जगाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे या विषाणूचा आणखी एक जत्रेत हरवलेला छोटा भाऊ दक्षिण आफ्रिकेत सापडला. अगदी लॉस्ट अँड फाऊंड या मनमोहन देसाई यांच्या चित्रपटाप्रमाणे.

७० टक्के वेगाने संक्रमित होणार्या या ब्रिटिश कोरोनाने सर्वत्र दहशत माजवली आहे. अमेरिका, युरोप भारत तसेच काही आखाती देशांत यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रेट ब्रिटन बरोबर सुरू असलेली विमानसेवा भारताने रद्द करून खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात अमेरिका आधीच्या चीनच्या कोरोनाचे पूर्ण नामोनिशाण मिटायच्या आधी ब्रिटिश कोरोनाने हात पाय पसरणे सुरू केले आहे. स्पेन, पोलंड, स्वित्झर्लंड, रशिया, जॉर्डन आदी देशांनी त्यांची विमान सेवा रद्द केली आहे.

पण सर्वात मोठा कळीचा मुद्दा असा आहे की लंडनचे हिथ्रो विमानतळ हे संपूर्ण जगात कोणत्याही देशात जाण्यासाठी जंक्शन म्हणून पाहिले जाते. जगभरात अनेक विमाने ही लंडनमार्गे उड्डाण करत असतात.  त्यामुळे अनेक देशांना सर्वात आधी आपल्या हवाई सीमा बंद कराव्या लागतील. आणि सर्वात मोठे आव्हान हे सर्वच देशासमोर आहे.

हा नवीन कोरोना आधीच्या कोरोनापेक्षा ७० टक्के अधिक वेगाने पसरतो असे निदर्शनास आले आहे. याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ या विषाणूने आतापर्यंत १२ हजार वेळा स्वतःमध्ये जनुकीय बदल केले आहेत. जनुकीय बदल होऊन नव्याने अवतार घेतलेल्या या ब्रिटिश कोरोनाला बी वन वन सेव्हन असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूने त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये बदल केले आहेत. आपण जे कोरोना विषाणूचे चित्र पाहतो त्यामधील काटेरी भागाला स्पाईक म्हणतात.

उपलब्ध माहितीनुसार जगभरातील तज्ज्ञांनी १८५ वेळा जनुकीय बदल केलेल्या या विषाणूचा सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे या बी वन वन सेव्हनने नेमके कसे बदल केले आहेत याची कोणालाच माहिती नाही.

भारतासह जगभरात अनेक देशात मोठा गाजावाजा करत लस आणण्यासाठी मोठी घिसाडघाई सुरू आहे. ही लस कोरोनाच्या नेमक्या कोणत्या जनुकीय बदलावर अभ्यास करून केली आहे याचे ठोस उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळे आता या तयार होत असलेल्या लस किती प्रभावी ठरणार याबाबत साशंकता आहे. जर तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर या विषाणूने आतापर्यंत १२ हजार वेळा जनुकीय बदल केले आहेत आणि तज्ज्ञांकडून केवळ १८५ पर्यंत जनुकीय बदल झालेल्या विषाणूवर अभ्यास केला असेल तर लस कोणत्या निकषात बसणार हे कोडे आहे.

नवीन वर्ष २०२१च्या पूर्व संध्येला बी वन वन सेव्हन या नवीन अवतारातल्या या अज्ञात कोरोना विषाणूने एन्ट्री करत २०२० प्रमाणे २०२१ कसे असेल याची झलक दाखविली आहे. लस सध्या तरी लवकर येणे शक्य नाही आणि ती जर आली तर त्याचा प्रभाव किती असेल हे अगदी लस निर्मिती करणाऱ्या औषध कंपन्या सुद्धा सांगू शकणार नाहीत.

२०२०च्या मार्चपासून सर्वांनीच मास्क , सोशल डिस्टन्स आणि दो गज की है जरुरी, हे आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनविला आहे. २०२१ मध्ये सुद्धा पूर्ण वर्षभर हेच कटाक्षाने पाळावे लागेल. कारण कोरोना हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कसून तयारी करत आहे. आपल्याकडील कोरोना योद्धे थकले पण हा कोरोना अजिबात थकलेला नाही. नवीन वर्षाच्या स्वागतात त्याला कोठे विसरू नका आणि आसपास कोठे फिरकू देऊ नका .

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: