बाबरी प्रकरणी मी निर्दोषः मुरली मनोहर जोशी

बाबरी प्रकरणी मी निर्दोषः मुरली मनोहर जोशी

लखनौः बाबरी मशीद पाडल्याप्रकरणातील एक आरोपी व भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (८६) यांनी गुरूवारी विशेष सीबीआय न्यायालयापुढे जबाब देताना आपण या प

बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’

लखनौः बाबरी मशीद पाडल्याप्रकरणातील एक आरोपी व भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (८६) यांनी गुरूवारी विशेष सीबीआय न्यायालयापुढे जबाब देताना आपण या प्रकरणात निर्दोष असून तत्कालिन काँग्रेस सरकारने आपल्याला या प्रकरणात गोवले असल्याचा आरोप केला. आपल्या विरोधातले सर्व पुरावे खोटे, बनावट आणि राजकीयदृष्ट्या हेतूने प्रेरित असल्याचाही दावा त्यांनी केला.

बाबरी मशीद पाडल्यानंतरचा सर्व तपास राजकीय प्रभावाखाली करण्यात आला, यात बनावट व खोटे पुरावे तयार केले गेले. अनेक साक्षीदारांचे जबाब खोटे होते, केवळ राजकीय हेतूने व पोलिसांच्या दबावातून आपल्याविरोधात सर्व आरोप दाखल करण्यात आले असे जोशी म्हणाले.

गुरुवारी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्स सुनावणीत विशेष सीबीआय न्यायालयाने जोशी यांना १, ०५० प्रश्न विचारले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोशी यांनी दिली.

सीबीआयने जे काही पुरावे सादर केले होते, त्यावर आपले काय मत आहे, असे न्यायालयाने विचारल्यानंतर हे सर्व पुरावे खोटे असल्याचे जोशी यांनी बचाव केला.

या सुनावणीत न्यायालयाने २५ जून १९९१ रोजी उ. प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि दुसर्या दिवशी ते आपल्या मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थळावर गेले होते. त्यावेळी सीबीआयच्या साक्षीदाराच्या मते कल्याण सिंग यांनी घटनास्थळी जाऊन राम लल्ला हम आयेंग, मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा दिली होती, या घोषणेवर आपले मत काय आहे, असे जोशी यांना विचारले. त्यावर जोशी म्हणाले, कल्याण सिंग त्यावेळी अयोध्येत गेले होते हे सत्य आहे पण सीबीआयचा साक्षीदार जे काही सांगत आहे, ते खोटे आहे.

यावेळी न्यायालयाने २६ जून १९९१सालचा राम जन्मभूमी परिसरात कल्याणसिंग भाजपमधील काही नेत्यांसोबत असल्याचा एक फोटो जोशी यांना दाखवला व ही घटना नेमकी काय आहे, असे विचारले असता, जोशी यांनी हा फोटो खोटा असून सीबीआयकडे अशा फोटोची कोणतीही निगेटिव्हही नसल्याचा दावा केला.

हा फोटो स्वप्ना दास गुप्ता यांनी सीबीआयच्या चौकशी दरम्यान दिला होता.

न्यायालयाने भाजपचे नेते अडवाणी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रामजन्मभूमी संदर्भात वर्तमानपत्रात आलेली अनेक वादग्रस्त विधानांची कात्रणे जोशी यांना दाखवली व त्यासंदर्भात जोशी यांना विचारले. त्यावर जोशी यांनी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या खोट्या होत्या व त्या सीबीआयच्या तपासाला पूरक होत्या असाही दावा केला.

आपण आपल्या बाजूचे पुरावे सुनावणीच्या योग्य वेळी सादर करू असे जोशी यांनी न्यायालयाला सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: