२३-२४ जुलैला जोशी- अडवाणींचा जबाब नोंदवणार

२३-२४ जुलैला जोशी- अडवाणींचा जबाब नोंदवणार

लखनौः अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी यांचा जबाब अनुक्रमे २३ व २४ जुलै रोजी विशेष सीबीआय न

महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित
रामजन्मभूमीची वादग्रस्त जमीन हिंदू पक्षकारांकडे तर मुस्लिमांना अन्य ठिकाणी जमीन
रामजन्मभूमी : विचित्र तर्क असलेला निकाल

लखनौः अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी यांचा जबाब अनुक्रमे २३ व २४ जुलै रोजी विशेष सीबीआय न्यायालय नोंदवून घेणार आहे. हा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवून घेतला जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. यादव यांनी सोमवारी असे आदेश दिले. भारतीय दंडसंहितेतील सेक्शन ३१३ अन्वये हा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

न्यायालय या प्रकरणातील अन्य ३२ आरोपींचेही जबाब ३१३ अन्वये नोंदवून घेत आहे. येत्या ३१ ऑगस्टला रोजी या खटल्याची सर्व सुनावणी संपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाला दिले होते. त्यादृष्टीने सर्व आरोपींचे जाबजबाब नोंदवून घेतले जात आहे. २२ जुलैला शिवसेनेचे खासदार सतीश प्रधान यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

सोमवारी या खटल्यातील एक आरोपी सुधीर काकर यांनी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला जबाब नोंदवला. ते म्हणाले, या प्रकरणात आपण निर्दोष असून राजकारणापायी काँग्रेस सरकारने आपल्याला या खटल्यात विनाकारण गोवले आहे.

मंगळवारी आणखी एक आरोपी राम चंद्र खत्री यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

या महिन्याच्या सुरूवातील भाजपच्या एक नेत्या उमा भारती यांचाही जबाब नोंदवून घेतला गेला होता. त्यांनी राजकीय सूडबुद्धीतून आपल्यावर काँग्रेसने खटला दाखल केल्याचा आरोप केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0