बाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कटः न्या. लिबरहान

बाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कटः न्या. लिबरहान

नवी दिल्लीः अयोध्येत बाबरी मशीद पाडावी यासाठी अत्यंत काटेकोरपणे कारस्थान रचले गेले होते. भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी या कटाची जबाबदारी स्वीकारली ह

बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
बाबरी कटातील कल्याणसिंगाची भूमिका काळाच्या पडद्याआड
बाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी

नवी दिल्लीः अयोध्येत बाबरी मशीद पाडावी यासाठी अत्यंत काटेकोरपणे कारस्थान रचले गेले होते. भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी या कटाची जबाबदारी स्वीकारली होती. ही मशीद अज्ञात शक्तींनी पाडली नाही तर माणसांनी पाडली, असे मत बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची चौकशी करणार्या माजी न्या. मनमोहन सिंग लिबरहान यांनी व्यक्त केले.

माजी न्या. लिबरहान यांच्या अध्यक्षतेखाली बाबरी मशीद विध्वंस घटनेचा तपास करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता.

बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस कटकारस्थान रचले गेले नव्हते, ही मशीद समाजकंटकांनी पाडली असे स्पष्ट करत पुराव्या अभावी ३२ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. न्यायालयाच्या या निकालावर लिबरहान यांनी भाष्य केले नाही पण त्यांनी आयोगाकडे नेमके काय झाले याची माहिती दिली.

ते म्हणाले, बाबरी मशीद पाडणे हा कट होता व माझ्यापुढे ज्यांनी जबाब, साक्ष दिली त्यातून स्पष्ट दिसत होते की हा कट सुनियोजित रचला गेला होता. उमा भारती यांनी याची जबाबदारी घेतली होती. एवढ्या प्रचंड कारसेवकांना स्वैच्छिक आणता येत नाही तर ते जमवावे लागते व योजनाबद्धरित्या करण्यात आले होते.

माझ्यापुढे अडवाणी, वाजपेयी व अन्य नेते साक्ष देण्यासाठी आले होते. पण ते स्वतःच्या विरोधात कसे साक्ष देतील. त्यातील काहींनी बाबरी विध्वंसाची जबाबदारी घेतली. उमा भारती यांनी तर जबाबदारी घेतली होती. आता जर न्यायाधीश हे नेते जबाबदार नाहीत असे म्हणत असतील तर मी त्याला काय करू, माझ्यापुढे दिलेल्या साक्षींवरून तर स्पष्ट दिसत होते की बाबरी मशीद विध्वंसहा सुनियोजित कट होता.

लिबरहान अहवालात भाजपचे नेते अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासहीत विंहिपचे नेते व प्रशासनातील कर्मचार्यातील ६० जणांवर देशात धार्मिक तणाव वाढवून देश दंगलीच्या उंबरठ्यावर नेल्याचा ठपका ठेवला होता.

लिबरहान पुढे म्हणाले की, या अहवालात मी मांडलेले निष्कर्ष योग्य होते, त्या सत्यता, प्रामाणिकता होती, त्यात भय लपलेले नव्हते. हा अहवाल भावी पिढीला ईमानदारी कशी असते हे सांगेल, हा अहवाल इतिहासाचा भाग आता राहील.

लिबरहान यांनी विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही टिप्पण्णी केली नाही. प्रत्येक जण मेहनत व ईमानदारीने काम करत असतो. न्यायालयाला त्यांचे भिन्न मत ठेवता येऊ शकते, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0