नारायण राणे यांना जामीन

नारायण राणे यांना जामीन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली असून, त्यांना रात्री महाड सत्र न्या

ऑक्सिजनअभावी मृत्यूंची माहिती नाहीः केंद्र सरकार
मोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये
उद्योगांचाही कोव्हिडविषयक टास्क फोर्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली असून, त्यांना रात्री महाड सत्र न्यायालयाने जामीन दिला.

महाडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारली असती असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हे दाखल झाले.

या गुन्ह्यांमध्ये अटक होऊ शकते असे लक्षात आल्यावर राणे यांच्याकडून रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. जो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली.

जन आशीर्वाद यात्रेत असणाऱ्या नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्यांना महाड न्यायालयामध्ये संध्याकाळी नेण्यात आले.

दरम्यान सकाळपासून नारायण राणेंच्या विरोधात शिवसेना, युवा सेना आक्रमक झाली होती. तर अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली आहे.

अनिकेत निकम यांनी नारायण राणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, गुन्हे बेकायदेशीर असल्याचे त्यात म्हंटले आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

दरम्यान सकाळी नारायण राणे यांनी माध्यमांवर हे प्रकरण वाढवल्याचा आरोप केला होता.

अटकेनंतर राणे यांना रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. न्यायालयात राणे यांच्या वकिलांनी हाच प्रकृतीचा मुद्दा मांडला होता. सरकारी वकील भूषण साळवी यांनी राणे यांच्या ७ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र राणे यांना न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर लगेच जामीन मंजूर केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले, की नारायण राणे हे नॉर्मल नसून अॅबनॉर्मल आहेत आणि त्यांची जागा मनोरुग्णालयात आहेत. मात्र आता न्यायालयाने त्यांना जामीन दिला असून, त्यांनी जबाबदारीने वागावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0