बंगळुरुः वादग्रस्त फेसबुक पोस्टने दंगल, ३ ठार

बंगळुरुः वादग्रस्त फेसबुक पोस्टने दंगल, ३ ठार

नवी दिल्लीः सोशल मीडियात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट लिहिल्यामुळे उद्रेक होऊन सुमारे एक हजाराच्या जमावाने बंगळुरुतील पुलके

छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा विधानसभेत निषेध
बंगळुरात ३ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा पत्ता खोटा
बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू

नवी दिल्लीः सोशल मीडियात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट लिहिल्यामुळे उद्रेक होऊन सुमारे एक हजाराच्या जमावाने बंगळुरुतील पुलकेशी नगर येथील एका काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला तसेच दोन पोलिस ठाण्यांची नासधुस केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जमावातील तीन जण ठार झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. पहाटे एक वाजता पोलिसांनी जमावावर नियंत्रण आणले व सुमारे १०० हून अधिक जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे नातेवाईक पी. नवीन याने प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट सोशल मीडियात लिहिल्याने संतप्त जमाव मूर्ती यांच्या घराबाहेर जमा झाला व त्यांनी घराची तोडफोड केली व अनेक वाहनांची नासधूस केली.

न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हा जमाव मूर्ती यांचा नातेवाईक पी. नवीन यांना अटक करावी म्हणून केजी हल्ली व डीजे हल्ली या पोलिस ठाण्यापाशी जमा झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली व आग लावण्याचा प्रयत्न केला.

तर द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार पी. नवीन याने आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे सांगत या पोस्टबद्दल माहिती नाही, असा दावा केला.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरूचे पोलिस कमिशनर कमल पंत यांनी पी. नवीन यांना बुधवारी अटक केल्याचे सांगत आग लावणे, दगडफेक व पोलिसांवरील हल्ल्या प्रकरणात ११० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करत या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: