बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ शवांना स्मशानात नेले

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ शवांना स्मशानात नेले

औरंगाबादः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजमध्ये ठेवलेल्या २२ शवांना एकाच रुग्णवाहिकेतून नेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना उघ

छोटे व मध्यम उद्योजकांना आता १ लाख कोटीचे पॅकेज
सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी
ऑटो इंडस्ट्रीपुढे कुशल कामगार मिळण्याचे आव्हान

औरंगाबादः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजमध्ये ठेवलेल्या २२ शवांना एकाच रुग्णवाहिकेतून नेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेबाबत या कॉलेजचे डीन डॉ. शिवाजी शुक्रे यांनी आमच्या रुग्णालय प्रशासनाकडे पर्याप्त रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एकाच रुग्णवाहिकेतून २२ शव न्यावी लागली असा खुलासा केला आहे.

आमच्या रुग्णालयाकडे गेल्या वर्षी ५ रुग्णवाहिका होत्या. पण कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ३ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या व सध्या केवळ २ रुग्णवाहिकांद्वारे कोविड-१९ रुग्णांना आणण्यात येत आहे, असे डॉ. शुक्रे यांनी सांगितले. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना कधी शोधण्यास वेळ जातो तर नजीकच्या लोखंडी सावरगाव येथील कोविड-१९ केंद्रावरचे मृतदेह त्यांच्याकडे शीतगृहांची व्यवस्था नसल्याने आमच्याकडे पाठवले जातात. आम्ही ३ नव्या रुग्णवाहिका हव्या असल्याचे पत्र १७ मार्चला जिल्हा प्रशासनाला पाठवले होते पण त्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मांडवा रोड येथील स्मशनात नेण्याची जबाबदारी मेडिकल कॉलेजची आहे, असे स्पष्ट केले. आमची पथके मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. सोमवारी या मुद्द्यावर एक बैठक झाली होती. या बैठकीत डीन यांनी पर्याप्त रुग्णवाहिका नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता पण जर हा प्रश्न असेल तर त्यांनी आपल्या अधिकारात का निर्णय घेतला नाही, असा सवाल केला आहे.

मूळ बातमी

(वृत्त छायाचित्र प्रतिकात्मक )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0