‘भारत बायोटेक’चा नवा प्लॅन्ट पुण्यात

‘भारत बायोटेक’चा नवा प्लॅन्ट पुण्यात

मुंबई: कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत

तेलंगणमधील न्यायालयाच्या निर्णयावर ‘द वायर’चा खुलासा
‘कोविशिल्ड’ व ‘कोवॅक्सिन’ लसीच्या वापरास मंजुरी
लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’

मुंबई: कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली.

अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. त्या भर म्हणून भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल, असे पवार म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: