दिल्लीबाहेर रहा, या शर्तीवर चंद्रशेखर आझादांना जामीन

दिल्लीबाहेर रहा, या शर्तीवर चंद्रशेखर आझादांना जामीन

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने केल्याप्रकरणी अटकेत असलेले भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींवर जामीन दिला. चंद्रशेखर आझाद यांनी निदर्शने करताना जमावाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता.

बुधवारी जामीन मंजूर करताना न्यायालयाने आझाद यांना येत्या चार आठवड्यात दिल्लीत येण्यास बंदी घातली आहे तसेच त्यांना दिल्ली निवडणुकांच्या काळात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद यांना २५ हजार रु.च्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

२० डिसेंबरला चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांची परवानगी न घेता जामा मशीद ते जंतरमंतर या मार्गावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

१४ जानेवारी रोजी आझाद यांच्या जामीन अर्जावर टिप्पण्णी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने आझाद यांचा धरणे, आंदोलनाचा घटनात्मक हक्क पोलिस हिरावू शकत नाही, असे मत व्यक्त केले होते.

मूळ बातमी

COMMENTS