भीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

भीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणताही लक्षणीय पुरावा सादर केलेला नाही असा आरोप रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, वरवरा राव आणि सुधीर ढवळे यांनी केला आहे.

भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे
अन्नत्यागानंतर साईबाबांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र

एका सत्र न्यायालयाने बुधवारी भीमा कोरेगाव प्रकरणातील सहा आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणताही लक्षणीय पुरावा सादर केलेला नाही असा युक्तिवाद करत रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, वरवरा राव आणि सुधीर ढवळे यांनी जामिनासाठी याचिका दाखल केल्या होत्या.

आरोपी आणि माओवादी यांच्यामध्ये संबंध असल्याचे दाखवणारी सामग्री मिळाली आहे असे म्हणत सरकारी पक्षाने या याचिकांना विरोध केला.

पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषद कार्यक्रमामध्ये झालेल्या स्फोटक भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी (१ जानेवारी, २०१८ रोजी) कोरेगाव भीमा येथील स्मृतीस्तंभापाशी जातीयवादी हिंसा भडकली.

पोलिसांचा दावा आहे, की या कार्यक्रमाला माओवाद्यांचा पाठिंबा होता.  जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये अनेक डाव्या विचारांचे कार्यकर्ते आणि लेखकांना पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, अद्याप ज्यांना अटक झालेली नाही असे खटल्यातील आणखी एक आरोपी गौतम नवलखा, यांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होईल.

(पीटीआय)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: