शोमा सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला

शोमा सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईः भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व मानवाधिकार कार्यकर्त्या शोमा सेन यांना शुक्रवारी प्रकृतीच्या कारणास्तव हंगा

एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक
अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार
गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईः भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व मानवाधिकार कार्यकर्त्या शोमा सेन यांना शुक्रवारी प्रकृतीच्या कारणास्तव हंगामी जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देणे हे काही सबळ कारण होऊ शकत नाही, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शोमा सेन सध्या भायखळा महिला कारागृहात असून कित्येक दिवसांपासून त्या हायपरटेंशन, ऑस्टियोआर्थराइटिस व अन्य काही आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यांनी आपल्या जामीन अर्जात कोरोना विषाणूचाही संसर्ग होईल अशी भीती व्यक्त केली होती. शोमा सेन यांच्या वकिलांनी आपल्या अशीलाच्या वयाचा व त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील मुद्दे न्यायालयापुढे उपस्थित केले.

पण न्यायालयाने सेन यांना जामीन नाकारत कारागृह प्रशासनाला आरोपींच्या प्रकृतीविषयी योग्य पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या महिन्यात भीमा-कोरेगांव प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले कवी व लेखक वरवरा राव (८१) हे तुरुंगातच बेशुद्ध पडले होते. त्यांना नंतर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने वरवरा राव यांना लगेचच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांना जामीन देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते.

एल्गार परिषद प्रकरणात तुरुंगात सध्या ११ आरोपी आहेत व यांच्यावर ३१ डिसेंबर २०१७मध्ये एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण देण्याचा आरोप आहे. या भाषणामुळे दुसर्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार पसरला होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

कोविड-१९ काळात तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासंदर्भात एक उच्चस्तरिय समिती नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाच्या आधारावर गेल्याच महिन्यात शोमा सेन व वरवरा राव यांनी जामीन अर्ज केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: