पुतीन खुनी असल्याचा बायडन यांचा आरोप

पुतीन खुनी असल्याचा बायडन यांचा आरोप

सीएनएनः अमेरिकी वृत्तवाहिनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना खूनी म्हटल्याने रशियाचे

गर्भपाताचा अधिकार रद्द करण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया
२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज
अमेरिकेतला उद्रेक

सीएनएनः अमेरिकी वृत्तवाहिनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना खूनी म्हटल्याने रशियाचे अमेरिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बुधवारी रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूताला परत बोलावून घेतले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीयपदाच्या निवडणुकांत घातपात करण्याचा पुतीन यांचा प्रयत्न होता. आपल्या उमेदवारीवरच संशय निर्माण करण्याचे काम रशियाकडून सुरू होते. त्याची किंमत रशियाला चुकवावी लागेल असे बायडन यांनी स्पष्ट केले. या मुलाखतकाराने पुतीन हे खुनी आहेत का, असा सवाल केला असता, बायडन यांनी हो ते आहेत, असे म्हटल्याने वाद उफाळून आला.

रशियाच्या प्रवक्त्याने आजपर्यंतच्या इतिहासात अशी घटना घडली नव्हती असे स्पष्ट करत बायडन यांना रशियासोबत संबंध चांगले प्रस्थापित करायची इच्छा दिसत नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांकडून ही अत्यंत वाईट प्रतिक्रिया आहे. उभय देशांमधील संबंध हे खराबच आहेत, ते आता बायडन यांच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले असे क्रेमलिनने म्हटले आहे.

बायडन यांनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीत पुतीन यांच्यावर बरीच टीका केली आहे. २०११मध्ये आपण पुतीन यांच्याशी चर्चा करताना त्यांना (पुतीन) हृदय नसल्याचे आपण बोललो होतो. जगातल्या अनेक नेत्यांशी माझी भेट झाली आहे, प्रत्येक नेत्याला आपण ओळखतो, तसे पुतीन यांना ओळखून असल्याचे बायडन या मुलाखतीत म्हणाले.

मंगळवारी अमेरिकेच्या गुप्तचर समुहातून २०२०च्या अमेरिकेच्या अध्यक्षीयपदाच्या निवडणुकांत रशियाने हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचा आरोप केला. बायडन यांची प्रतिमा कलंकित करून ट्रम्प यांना मदत करण्याचा रशियाचा प्रयत्न होता. रशियाने त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात खोट्या माहितीचा मारा अमेरिकेत करण्याचा प्रयत्न केला, असे गुप्तचर अहवालात म्हटले आहे.

पुतीन यांना त्यांनी केलेल्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असे बायडन यांनी म्हटलेले असले तरी अमेरिका रशियाच्या विरोधात नेमकी काय पावले उचलणार आहे, या बद्दल स्पष्टता झालेली नाही. अमेरिका पुढील आठवड्यात रशियावर काही आर्थिक निर्बंध घालणार असल्याचे अमेरिकी प्रशासनातील काही अधिकार्यांनी सीएनएनला सांगितले आहे. त्याचबरोबर चीन व इराणविरोधातही अमेरिका काही पावले उचलणार असल्याचीही चर्चा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0