बिहारः ११ जागांवर १ हजाराहून कमी मताने उमेदवार विजयी

बिहारः ११ जागांवर १ हजाराहून कमी मताने उमेदवार विजयी

बिहार विधानसभा निवडणुकांत २४० जागांपैकी ११ जागांवर झालेल्या चुरशीच्या लढतीत विजयी व पराभूत उमेदवारांमधील मतांचे अंतर १ हजाराहून कमी पाहायला मिळाले तर

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार
बिहारः एनडीएचा पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा
मुजफ्फरपूर – सामाजिक विषमतेचे बळी

बिहार विधानसभा निवडणुकांत २४० जागांपैकी ११ जागांवर झालेल्या चुरशीच्या लढतीत विजयी व पराभूत उमेदवारांमधील मतांचे अंतर १ हजाराहून कमी पाहायला मिळाले तर ४० जागांमध्ये हे अंतर ३,५०० मतांपेक्षा कमी दिसून आले आहे.

हिल्सा मतदारसंघात जेडीयूच्या उमेदवाराने केवळ १२ मतांनी राजदच्या उमेदवारावर विजय मिळवला. कमी मताधिक्याने विजय मिळवल्याचा फायदा जेडीयू, भाजप, व्हीआयपी व हम या पक्षांना अधिक झाला. या पक्षांनी २१ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने ५, राजदने १०, भाकपा, भाकपा-मालेने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. एका अपक्षानेही कमी मताधिक्याने निवडणूक जिंकली.

चिराग पासवान यांच्या लोजपाला या निवडणुकांत केवळ १ जागा मिळाली पण ही जागाही त्यांनी केवळ ३३३ मतांनी जिंकली.

राजदचे उमेदवार काही उमेदवार अत्यंत कमी मताने हरले. त्या जागा अलीनगर, बहादुरपूर, बेलहर, चकई, हाजीपूर, हिल्सा, झाझा, महिषी, मुंगेर, परिहार, रानीगंज व त्रिवेणीगंज या होत्या.

या निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी फारशी उंचावली नाही. काँग्रेसने ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते पण त्यांना केवळ १९ ठिकाणी विजय मिळला. त्यापैकी ४ जागांवर त्यांनी निसटता विजय मिळवला. तर ५ प्राणपुरा, सकरा, टिकरी, बरबीघा, अमरपूर येथील त्यांच्या जागा थोडक्यात गेल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: