‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन

‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन

श्रमिक ट्रेनद्वारे देशात विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या घरी सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या स्थलांतरितांची होणारी परवड मात

तृणमूलमध्ये यशवंत सिन्हांच्या प्रवेशाने काय साध्य होईल?
‘काशी विश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणी पुरातत्व सर्वेक्षण करावे’
अनेक अर्थांचा ‘अनेक’

श्रमिक ट्रेनद्वारे देशात विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या घरी सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या स्थलांतरितांची होणारी परवड मात्र थांबलेली नाही. त्यांना वेळेवर अन्नपाणी मिळत नाहीये, त्याचबरोबर प्रचंड उकाड्यामुळे अनेक श्रमिक बेशुद्ध पडतानाची वृत्ते वा व्हिडिओ प्रसिद्ध झाली आहेत. असाच एक व्हिडिओ २५ मे रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर रेल्वेस्थानकात चित्रित करण्यात आला. या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेचा मृतदेह पडलेला होता आणि तिचे छोटे मूल आपल्या आईच्या अंगावरची चादर ओढत तिला जागे करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात संताप उफाळून आला. अनेक नेटिझननी माणूसकी शून्य प्रशासनावर चौफेर टीका केली.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचे नाव अरवीना खातून (३५) असून ती बिहारमधील कटिहार येथे राहणारी होती. गेल्या रविवारी आपल्या बहिणीसोबत ती अहमदाबादेतून श्रमिक ट्रेनने बिहारकडे जात होती. प्रवासादरम्यान तिला अन्नपाणी न मिळाल्याने तिची प्रकृती ढासळत गेली आणि सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ट्रेनमध्ये तिचा मृत्यू झाला.

ही ट्रेन मुझफ्फरपूर जंक्शनमध्ये दुपारी ३ वाजता पोहचल्यानंतर रेल्वे महिला पोलिसांनी तिचा मृतदेह प्लॅटफॉर्मवर उतरवला. जेव्हा तिच्या मृतदेहावर चादर टाकण्यात आली तेव्हा तिच्या अडीच वर्षाच्या मुलाने आईला जागे करण्यासाठी अंगावरची चादर ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण सोशल मीडियात आल्याने रेल्वे प्रशासनाच्या एकूण अमानवीय कारभाराबाबत संताप व्यक्त होऊ लागला.

पण रेल्वे जीआरपी डेप्यु. एसपी रमाकांत उपाध्याय यांनी सांगितले की, या महिलेचा मृत्यू भूकबळीने झालेला नाही. त्यांच्या प्रवासात अन्न व पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही. ही घटना २५ मेची असून महिलेचा मृत्यू मधुबनी येथे झाला. त्यावेळी तिच्या बहिणीने सांगितले की अरवीनाचा प्रवासामध्येच अचानक मृत्यू झाला. आम्हाला अन्नपाण्याचा प्रश्न भेडसावला नाही. गेले वर्षभर अरवीना आजारी होती, ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. तिच्या मृत्यूचे कारण डॉक्टरच सांगू शकतील, असे उपाध्याय यांनी सांगितले.

मुझफ्फरपूर स्थानकात अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

याच मुझफ्फूर रेल्वे स्थानकात भीषण उकाडा व अन्नपाण्याविना एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटत आढळून आली.

एनडीटीवीने दिलेल्या वृत्तानुसार  या मुलाच्या पालकांनी त्यांना रेल्वे प्रवासात अन्न व पाणी न मिळाल्याने मुलाची प्रकृती वेगाने ढासळत गेली व नंतर मुलाचा मृत्यू झाल्याचा रेल्वे प्रशासनावर आरोप केला.

या मुलाचे वडील मकसूद आलम हे दिल्लीत पेंटरचे काम करतात. ते रविवारी आपल्या कुटुंबाला घेऊन निघाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मुझफ्फरपूरमध्ये ट्रेन पोहोचली पण भीषण उकाडा व अन्न पाण्याविना मुलाची तब्येत बिघडली. त्यानंतर सुमारे चार तास आलमचे कुटुंबिय मदतीची याचना प्रशासनाकडे करत होते पण त्यांना मदत मिळाली नाही. त्या दरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: