प. बंगाल: ८ जणांचे हत्याकांड; २१ जण आरोपी

प. बंगाल: ८ जणांचे हत्याकांड; २१ जण आरोपी

कोलकाताः प. बंगालमधील रामपूरहाट येथे ८ जणांना जाळून ठार मारण्याच्या घटना प्रकरणी सीबीआयने २१ जणांना आरोपी केले आहे. सीबीआयने आपल्या तपास प्रक्रियेचा व

‘अस्थाना प्रकरण : दोन महिन्यात अहवाल द्या’
इज्जतीचा प्रश्नः सीबीआयच्या ताब्यातील १०० किलो सोने चोरीस
बिहारमध्ये सीबीआयचे तपास संशयास्पदच!

कोलकाताः प. बंगालमधील रामपूरहाट येथे ८ जणांना जाळून ठार मारण्याच्या घटना प्रकरणी सीबीआयने २१ जणांना आरोपी केले आहे. सीबीआयने आपल्या तपास प्रक्रियेचा व्हीडिओ चित्रणही काढण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सीबीआयचे एक पथक रामपूरहाट पोलिस ठाण्यात पोहचले तेथून त्यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे व दस्तावेज ताब्यात घेतले.

शुक्रवारी प. बंगाल उच्च न्यायालयाने या जळीत हत्याकांड प्रकरणी सीबीआय चौकशी करेल असे आदेश दिले होते व या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या प. बंगाल पोलिसांच्या एसआयटीला सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लगेचच वेगाने घडामोडी घडू लागल्या. एसआयटी या प्रकरणाचा तपास योग्य करणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. न्यायालयाने स्वतःहून या घटनेची दखल घेत सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता.

नेमके प्रकरण काय आहे?

दोन आठवड्यापूर्वी बिरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट या गावात तृणमूल काँग्रेसचे पंचायत समिती नेते भाडू शेख यांची हत्या करण्यात आली होती. भाडू शेख हे या भागातील प्रभावशाली नेते असून त्यांच्या हत्येनंतर एका जमावाने ८ हून अधिक घरांना आगी लावल्या. यात ८ हून अधिक जण होरपळले त्यात दोन मुलांचा समावेश आहे. पण काही स्थानिकांच्या मते मृतांचा आकडा ८ पेक्षा अधिक आहे. या दुर्दैवी घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले. थेट केंद्रीय गृहखात्यापर्यंत तक्रारी गेल्या. यानंतर भाडू शेख याची झालेली हत्या हा एक व्यापक कट असल्याचे विधान ममता बॅनर्जी यांनी केले. या संदर्भातील दोषींना अटक व्हायला पाहिजे व ती होईल असेही त्या म्हणाल्या होत्या. ममता यांचा दौरा आटोपल्यानंतर लगेचच २० संशयितांना अटक करण्यात आली.

या जळीत हत्याकांड प्रकरणानंतर रामपुरहाट गाव व नजीकच्या भागातील ६९ जणांनी पलायन केले होते. फोरेन्सिक रिपोर्टनुसार होरपळलेल्यांना जबर मारहाण करण्यात आली होती व नंतर त्यांना जाळून टाकण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: