बंडखोरांमागे भाजप – पवार

बंडखोरांमागे भाजप – पवार

मुंबई : संख्येचा निर्णय विधानसभेत होईल, मात्र यामागे भाजप असल्याचे उघड झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्रातील राजकीय संकटावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, संख्येचा मुद्दा विधानसभेत येईल तेंव्हा सिद्ध होईल. हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू राहील.

“गुजरात आणि आसाम या ठिकाणची परिस्थिती मला माहिती आहे. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे. कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा हात आहे, हे सांगण्याची गरज नाही. सूरत आणि आसाममध्ये भाजपचा सहभाग आहे. तिथे कोण आहे, हे सांगण्याची गरज नाही.”

फुटलेल्या आमदारांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, “शिंदे मुंबईत आल्यावर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. त्या आमदारांना इथे मुंबईत यावेच लागेल. पक्ष बदल कायद्याचा सामना त्यांना करावा लागेल. त्या आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदार संघात जावे लागेल. त्याना परिणाम भोगावा लागेल.” पवार यांनी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे बंडखोरी करत असल्याचे विचारता, पवार म्हणाले, “अडीच वर्षात सत्ता असताना, त्यांना हिंदुत्वाची आठवण झाली नाही का? त्यांना आता काही करणे द्यायची आहेत, म्हणून अशी करणे दिली जात आहेत.”

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने उत्तम निर्णय घेतले, त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फासला असे म्हणणे, राजकीय अज्ञान आहे.

गुवाहाटीकडे गेलेल्या अनेकांच्या अनेक तपास यंत्रणांकडून चौकशा सुरू असल्याचे समजते, असेही पवार म्हणाले. इतके आमदार निघून गेले, ते गृहमंत्रालयला कळले नाही का, असे विचारता पवार म्हणाले, की त्याबाबत काय करायचे, हे योग्य वेळेला ठरवले जाईल. मात्र दखल घेतली जाईल. ही टी वेळ नाही.

COMMENTS