ज्योतिरादित्य गटातील आमदारांचे काय होणार?

ज्योतिरादित्य गटातील आमदारांचे काय होणार?

काँग्रेसचे तरुण फळीतील नेते ज्योतिरादित्य शिंदे बुधवारी भाजपमध्ये सामील झाले. ज्योतिरादित्य यांच्यासोबत काँग्रेसचे १९ आमदार होते व ते ज्योतिरादित्य गट

६ हजार कोटींच्या इलेक्ट्रोरल बाँडची विक्री
अवैज्ञानिक उद्योगात ‘आयआयटी’ही!
‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

काँग्रेसचे तरुण फळीतील नेते ज्योतिरादित्य शिंदे बुधवारी भाजपमध्ये सामील झाले. ज्योतिरादित्य यांच्यासोबत काँग्रेसचे १९ आमदार होते व ते ज्योतिरादित्य गटाचे मानले जातात, त्यांना बंगळुरूत हलवण्यात आले आहे. पण इकडे ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपमध्ये पाऊल ठेवताच या १९ आमदारांना अनाथ झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे भविष्यात म. प्रदेशच्या राजकारणात यापुढे काही गंभीर असे घटनात्मक प्रश्न निर्माण होणार आहेत व ते सोडवण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्यावर आहे.

ज्योतिरादित्यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्‌ठी देण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री कमलनाथ व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे दोघे हा एकूण पेच सांभाळत असताना त्यांच्या मदतीला कर्नाटकातील एक बडे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार आले आहेत. ज्योतिरादित्य यांच्या कॅम्पमधील काही आमदार डी. के. शिवकुमार यांच्या फार्महाऊसमध्ये आढळून आले आहेत तर काँग्रेसचे काही आमदार जयपूरला तर भाजपच्या आमदारांना गुरुग्राममध्ये पाठवण्यात आले.

आता काही दिवसांनी जेव्हा राजीनामा दिलेले २२ आमदार स्वत:चे पत्र घेऊन विधानसभा अध्यक्षांपुढे जातील तेव्हा त्यांना आपल्या राजीनाम्यामागची कारणे विधानसभा अध्यक्षांना पटवणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. या आमदारांना ते पक्ष का सोडत आहेत, याची योग्य कारणे सांगावी लागतील. संसदीय प्रथेप्रमाणे कोणत्याही आमदाराचा राजीनामा, त्याचे निलंबन वा त्याचे सदस्यत्व रद्द करण्याअगोदर विधानसभा अध्यक्षांना त्यामागची कारणे पटवून द्यावी लागतात. त्यानंतर मग अध्यक्ष निर्णय घेतात.

शक्यता ही आहे की, विधानसभा अध्यक्ष या २०-२२ आमदारांना ते त्यांच्या राजीनामापत्रासह इतके दिवस कुठे होते हा प्रश्न विचारू शकतात. आमदारांनी इ-मेलद्वारेही राजीनामे राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले आहेत. पण ही मंडळी इतके दिवस कुठल्या शहरात वास्तव्यास होती, ते ज्या विमानाने एकत्र ज्या ठिकाणी गेले त्याची तिकिटे, हॉटेलची बिलं विधानसभा अध्यक्षांनी मागितल्यास त्यांना ती सादर करावी लागतील. पण हे सादर करण्यास आमदारांना अपयश आले तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे या आमदारांनी आपला खासगी दौरा दाखवल्यास त्यांना लाच देऊन किंवा धमकावून किंवा दबाब आणून रिसॉर्टवर ठेवल्याचा मुद्दा पुढे येईल, आणि त्यावर विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय घटनेतील १९४ कलमांनुसार घेण्यास मोकळे होतील. काँग्रेसच्या रणनीतीकारांनी या २०-२२ आमदारांना पुढे अडकवण्यासाठी पावले उचलली आहेत.

आमदारांचे सदस्यत्व निलंबित करण्याची जी प्रमुख कारणे लोकप्रतिनिधित्व कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहेत, त्यात लाच स्वीकारणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. जर या आमदारांना लाच स्वीकारल्याच्या कारणामुळे निलंबित करण्यात आले तर हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाहीत. कर्नाटकात १७ आमदारांचे निलंबन झाले होते पण न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.

जे आमदार बंगळुरुमध्ये आहेत त्यांना कमलनाथ यांच्यापुढे काय अडचणी आहेत, हे समजवण्यासाठी कमलनाथ यांचे निकटवर्तीय सज्जन कुमार गेले आहेत. तर ज्या सहा मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यांना या पेक्षा अधिक काही मिळू शकत नाही, असेही त्यांनी सांगितल्याचे कळते. काही आमदार गेली १५ वर्षे काँग्रेसमध्ये काम करत असून ते भाजपविरोधात संघर्ष करत आमदार झाले आहेत आणि आता सत्तेत आल्यानंतर पुढील चार वर्षे पुन्हा त्यांना संघर्षात, अस्थिरतेत आपली उर्वरित आमदारकी काढण्याची तयारी नाही. एका आमदाराने ज्योतिरादित्य यांनी वेगळा गट स्थापन करावा पण भाजपमध्ये तुम्ही गेला हे आम्हाला पसंत नाही, अशी भूमिका घेतली आहेत. पक्षात गट स्थापन करून दबावाचे राजकारण करणे हे फायद्याचे असते. पण पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षाची वाट धरून स्वत:चे राजकारण रेटणे हा एक कठीण प्रयत्न असतो. ज्योतिरादित्य यांच्या समर्थनार्थ फुटलेल्या १० आमदारांनी भाजपमध्ये सामील होणे आपल्याला पसंद नसल्याचे म्हटले आहे.

त्याची राजकीय कारणेही आहेत. एक म्हणजे अनेक आमदारांनी भाजपच्या बड्या नेत्यांना हरवले आहे. जी. एस. शेजवर हे भाजपचे एक बडे नेते आहेत, ते गेल्या विधानसभा निवडणुकीत हरले आहेत. त्यामुळे या आमदारांना काँग्रेस व भाजपमधून मोठ्या प्रमाणात विरोध किंवा दबाव झेलावा लागू शकतो. काँग्रेसचे एक नेते गोविंद सिंग राजपूत १५ वर्षे संघर्ष करत होते, आज त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांना आजपर्यंत ज्यांच्या विरोधात राजकारण केले, निवडणुका लढल्या त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागते हे पचणारे नाही. अशीच अवस्था बुंदेलखंड प्रांतातील जयंत मलैय्या यांची आहे. तेही संघर्षातून मंत्री झाले आहेत.

ज्योतिरादित्य यांना बाजूला करण्याच्या राजकीय चाली दिग्विजय सिंह-कमलनाथ गटाकडून सुरू होत्या अशी भावना काँग्रेसमध्ये आहे. पण आता ज्योतिरादित्यांनी भाजपचे जहाज पकडले असेल तर त्यांच्या समर्थकांना पुन्हा पक्षात सन्मानाने घ्यावे असेही काँग्रेसमधील काहींना वाटत आहे. शिवाय कमलनाथ – दिग्विजय सिंह यांनी सरकार वाचवल्यास ज्योतिरादित्यांशिवाय हे सरकार चालू शकते असा संदेशही काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहचू शकतो. यावर काँग्रेसजन अवलंबून आहेत.

दुसरीकडे ग्वाल्हेरमधील भाजपचे एक नेते व राज्यसभेचे माजी सदस्य प्रभात झा यांनी ज्योतिरादित्य यांच्या भाजपप्रवेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्योतिरादित्य यांना भाजपमध्ये का घेण्यात आले त्यामागचे तार्किक कारण काय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ‘महाराज बनाम किसान’ या मुद्द्यावर निवडणूक झाली होती आता त्याच महाराजांना भाजपमध्ये सामील केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ज्योतिरादित्य यांची आत्या यशोधरा शिंदे या पूर्वी शिवराज सिंह सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांनी ज्योतिरादित्याच्या भाजप प्रवेशावर आनंद प्रकट केला असला तरी भविष्यात उत्तर मध्य प्रदेशात त्यांचे भाचेच त्यांना आव्हान देऊ शकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: