१ कोटी रोजगार, फुले, सावरकरांना भारतरत्न देण्याचा भाजपचा जाहीरनामा

१ कोटी रोजगार, फुले, सावरकरांना भारतरत्न देण्याचा भाजपचा जाहीरनामा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात १ कोटी रोजगार, दुष्काळमुक्त राज्य

महाविकास आघाडीचे फसलेले फ्लोअर मॅनेजमेंट
प्रजासत्ताक ते फॅसिझम
बंगालची निवडणूक आणि भारताचे राजकीय भवितव्य

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात १ कोटी रोजगार, दुष्काळमुक्त राज्य व म. फुले, सावित्रीबाई फुले व सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सुमारे ४० पानी जाहीरनाम्यात भाजपने आर्थिक विकासात ५० टक्के महिलांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

मंगळवारी नवी दिल्लीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्‌डा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

या जाहीरनाम्यात कृषी, सिंचन व पायाभूत सोयीसाठी अधिक विकास प्रकल्प राबवण्याचा मनोदय व्यक्त केला असून मध्यमवर्ग मतदाराला आकर्षित करण्यासाठी २०२१पर्यंत प्रत्येक कुटुंबाला एक घर मिळेल असे आश्वासन त्यात दिले आहे.

भाजपने पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमधील सुमारे १६७ टीएमसी पाण्यावर वीजप्रकल्प व संपूर्ण राज्यात नळाद्वारे पाणी पोहचवण्याची आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पुन्हा दिले आहे. तर २०२० पर्यंत इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करणार असाही इरादा व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: