मोठा कट उघड : भाजप पदाधिकाऱ्याला अटक

मोठा कट उघड : भाजप पदाधिकाऱ्याला अटक

पुणे : बँकेमध्ये निष्क्रीय असलेल्या (डॉरमंट) खात्यांची माहिती मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मोठा कट  उघडकीस आणल्याचा द

धंदा पाहावा करून…
सरकारी बँकांच्या संपाने ग्राहकांची प्रचंड गैरसोय
सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण

पुणे : बँकेमध्ये निष्क्रीय असलेल्या (डॉरमंट) खात्यांची माहिती मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मोठा कट  उघडकीस आणल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला असून, पुणे सायबर पोलिसांनी टोळीला जेरबंद केले आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. भाजपाचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.

रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करुन आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर बँकेमध्ये अनेक वर्षांपासून निष्क्रीय असलेल्या खात्यांची माहिती चोरून मिळविली आणि ती विकण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या सर्व बँक खात्यांमध्ये जवळपास २अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. अनेक दिवस पुणे सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली.

पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्लक असलेल्या बँक खात्यांची माहिती मिळाली.

रोहन रवींद्र मंकणी याने ही माहिती घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0