प्रज्ञा ठाकूर यांची लोकसभेत दोनदा माफी

प्रज्ञा ठाकूर यांची लोकसभेत दोनदा माफी

नवी दिल्ली : लोकसभेत म. गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचे विधान करणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लोकसभेत एक नव्हे

गाव आणि गांधी
मी आणि गांधीजी – ६
गांधी विचाराची विश्वव्यापकता

नवी दिल्ली : लोकसभेत म. गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचे विधान करणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लोकसभेत एक नव्हे तर दोनदा माफी मागावी लागली.

माझ्या विधानामुळे ज्या कुणांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागते. म. गांधी यांचा मी आदर करते, अशा शब्दांत त्यांना माफीनामा लोकसभेत मांडावा लागला.

शुक्रवारी शून्यप्रहरात प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नथुरामसंबंधित विधानामुळे विरोधक आक्रमक झाले होते. गुरुवारी प्रज्ञा सिंह यांची संसदेच्या संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी झाल्याने विरोधक समाधानी नव्हते. त्यात त्यांनी व्यक्त केलेली माफीही विरोधकांना मान्य नव्हती. त्यामुळे शुक्रवारी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या माफीनाम्यात,‘ माझे विधान चुकीच्या पद्धतीने तोडूनमोडून प्रसिद्ध केले असून माझे विधान अन्य संदर्भांशी निगडीत होते. पण मी म. गांधी यांच्या राष्ट्राप्रती कार्याचा आदर व सन्मान करत असून मी दहशतवादी असल्याचा आरोप संसदेतील एक सदस्याने केला होता. मी दहशतवादी नसून माझ्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही पण कोणताही न्याय न होताच मला दहशतवादी ठरवण्यात येत असून हा कायद्याचा भंग आहे. एका संन्यासी  व महिलेला दहशतवादी संबोधणे हा माझ्या आत्मसन्मानावर हल्ला असून मला अपमानित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा’ स्पष्टीकरण दिले होते.

त्यावर काँग्रेस, द्रमुक व अन्य विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. असला माफी मान्य नसल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. यावर भाजपच्या नेत्यांनी प्रज्ञा ठाकूर यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काँग्रेसचे सदस्य राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्याचा आग्रह लोकसभा अध्यक्षांकडे केला. लोकसभा खासदाराला दहशतवादी म्हणणे हा अपमान असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह अन्य भाजप सदस्यांनी केली. त्यांनी तशी हक्कभंगाची नोटीसही दिली. यावर काँग्रेसने खासदार सभागृहाबाहेर काय म्हणतात याचा या प्रकरणाशी संबंध नसून प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम देशभक्त असल्याचे विधान लोकसभेत केले आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे असा युक्तिवाद केला.

या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ घालण्यास सुरवात केली. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोणतीही अट न ठेवता सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज रोखून अध्यक्षांनी सर्व दलीय बैठक घेतली आणि नंतर एका ओळीची माफी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना द्यायला लावली.

प्रज्ञा सिंहच्या विरोधात पोलिसांत तक्रार

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात मध्य कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ठाकूर यांच्याविरोधातील तक्रार आयपीसी कलम १२४ ए व ४९९ (मानहानी) अंतर्गत नोंदवण्यात आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0