‘टेरर फंडिंग’ची चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून भाजपला देणगी

‘टेरर फंडिंग’ची चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून भाजपला देणगी

मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊदइब्राहिम याचा जवळचा साथीदार इक्बाल मेमन ऊर्फ इक्बालमिर्ची याच्या मालमत्तांची खरेदी-विक्री करणाऱ्या आरकेडब्लूडेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीकडून भाजपने १० कोटी रु.च्यादेणग्या घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

ए लाव रे तो……!
पी. चिदंबरम यांना अखेर अटक
कलम ३७१ला हात लावणार नाही : अमित शहा

नवी दिल्ली : १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी अंडरवर्ल्ड डॉनदाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची याच्या मालमत्तांची खरेदीविक्री करणाऱ्या आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीकडून भाजपने १० कोटी रु.च्या देणग्या घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. २०१४१५मध्ये ही देणगी घेण्यात आली असून, ही कंपनी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीशीही संलग्न आहे.

भाजपने आपले आर्थिक व्यवहार निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले होते त्यातून ही माहिती मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या संशयावरून आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कंपनीचे माजी संचालक रणजित बिंद्रा यांना ईडीने अटक केली असून, बिंद्रा यांच्यामार्फत अंडरवर्ल्डला आर्थिक मदत दिली जात असल्याच संशय आहे. ईडीच्या सूत्रांचा हवाला देऊन काही बातम्यांमध्ये बिंद्रा हे इक्बाल मिर्ची अन्य फर्ममध्ये एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

देशातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्या, हाऊसेसकडून भाजपला देणग्या मिळाल्या आहेत. पण आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेडने जेवढी देणगी (१०कोटी रु.) दिली आहे तेवढी देणगी एकाही कंपनीने, हाउसेसने भाजपला दिलेली नाही.

हे देणगी प्रकरण एवढ्या पुरते सीमित नाही.

तर इक्बाल मिर्चीच्या मालमत्ता विकत घेणाऱ्या सनब्लिंक रिअल इस्टेट ही कंपनी अन्य कंपनीने भाजपला कोटी रु. देणगी म्हणून दिले आहेत.सनब्लिंक रिअल इस्टेटकडून इक्बाल मिर्चीच्या मालमत्ता विकत घेतल्या म्हणून ईडी याही कंपनीची चौकशी करत आहे.

सनब्लिंक रिअल इस्टेटचे संचालक असलेले मेहुल अनिल बाविशी हे स्किलरिअलिटर्स प्राय. लिमिटेड या कंपनीचेही संचालक आहे. २०१४ मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या देणगी संदर्भातील माहिती भाजपने स्किल रिअलिटर्स प्राय. लिमिटेडकडून कोटी रु. देणगी घेतल्याचे नमूद केले आहे.

आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेडचे एक संचाल प्लेसिड जाकोब नरोन्हा हे दर्शन डेव्हलपर्स प्राय. लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. या दर्शन डेव्हलपर्सने भाजपला २०१६१७मध्ये कोटी ५० लाख रुपयाची देणगी दिली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात हेही नमूद केले आहे. इंडिया टुडेच्या एका वृत्तात नरोन्हा यांचीही ईडीकडून चौकशी केली जात असल्याचे आढळून आले आहे.

ईडीचे आरोप

ईडीचा असा आरोप आहे की, इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांचे व्यवहार पूर्णत्वास जाण्यासाठी आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेडने मदत केली असून या व्यवहारात ब्रिंदा यांनी सुमारे ३० कोटी रु.ची दलाली घेतली.

ईडीकडून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांचीही चौकशी सुरू आहे. राज कुंद्रा यांचे काही व्यवहार आरकेडब्लू डेव्हलपर्स लिमिटेडशी झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुका आणि इक्बाल मिर्ची

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांदरम्यान इक्बाल मिर्चीचा विषय चर्चेत आला होता. ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते प्रफुल पटेल यांची कंपनी मिल्येनियम डेव्हलपर्स, इक्बाल मिर्ची सनब्लिंक या तिघांमध्ये आर्थिकव्यवहार झाल्याची चौकशी सुरू केली होती. ईडीने प्रफुल पटेल यांची चौकशीही केली होती. त्यावेळी बिंद्रासह अन्य दोघांना अटकही केली होती.

प्रफुल पटेल यांनी आपल्या कंपनीकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. तर इक्बाल मिर्चीचा मेहुणा मुख्तार मेमन याची ईडीने चौकशी केली होती.

इक्बाल मिर्चीच्या ज्या मालमत्ता सनब्लिंक रिअल इस्टेट प्राय. लिमिटेड व मिल्येनियम डेव्हलपर्स प्राय. लिमिटेड या कंपन्यांमार्फत विकल्या गेल्या होत्या. त्या व्यवहाराबाबत मुख्तार मेमन असल्याचा संशय ईडीला होता.

गेल्या महिन्यात दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या देशभरातील १४ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. या छाप्यांमागचे कारण असे होते की, िवाण हाउसिंगने सुमारे,१८६ कोटी रु. सनब्लिंक या कंपनीला दिले होते. हा सर्व पैसा सनब्लिंकने दुबईमध्ये वळवल्याचा ईडीचा संशय होता. यासंदर्भात बिझनेस टुडेने ईडीच्या एका अधिकाऱ्याचा हवाला असे वृत्त दिले होते की सनब्लिंक-मिर्ची यांच्या व्यवहारात बिंद्रा यांनी मदत केली होती.

भाजपप्रफुल्ल पटेलईडी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याच्या मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. या निवडणुक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियाना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देत नसल्याची टीका केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाच्या जखमा आजही आठवतात, त्यावेळच्या सरकारने बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना, जखमींना न्याय दिला नाही पण या बॉम्बस्फोटाला जबाबदार असणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याऐवजी मिर्चीच्या बिझनेसला हे नेते मदत करत  आहेत, असा आरोप मोदी यांनी केला होता.

मिर्चीच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मिर्चीच्या कंपन्यांशी जे व्यवहार करतात तो देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा नाही असे म्हटले होते. या संदर्भातले वृत्त टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झाले होते पण ते वृत्त आता साइटवर आढळत  ाही पण प्रेसरिडर डॉट कॉम या साईटवर आढळते. त्याचबरोबर शहा यांचे वक्तव्य टाइम्स नाऊच्या वेबसाइटवर4’10’’ येथे मिळते.

ईडीने बिंद्रा यांना ताब्यात घेतले आहे पण त्याचबरोबर हारुन युसूफ याब्रिटिश नागरिकालाही अटक केली आहे. काही ठिकाणी आलेल्या वृत्तांनुसार बिंद्रा हा मालमत्तांचा ब्रोकर म्हणून काम करत होता तर युसूफ हा ट्रस्टना पैसेदेणेअन्य आर्थिक व्यवहारात मदत करत होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1