फेसबुकवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर

फेसबुकवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर

नवी दिल्लीः गेल्या १८ महिन्यात सामाजिक मुद्दे, निवडणुका व राजकारण यावर भाजपने फेसबुकवर अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केल्याचे

तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च
गृहमंत्र्यांच्या धमकीनंतर सब्यसाचीची जाहिरात मागे
इंदिरा गांधी पुण्यतिथीची जाहिरात नसल्याने काँग्रेसवर टीका

नवी दिल्लीः गेल्या १८ महिन्यात सामाजिक मुद्दे, निवडणुका व राजकारण यावर भाजपने फेसबुकवर अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. फेसबुक खर्च ट्रॅकरनुसार भाजपने २४ ऑगस्टपर्यंत फेसबुकवर सामाजिक मुद्दे, निवडणुका व राजकारण या मजकुरासाठी ४.१६ कोटी रु. खर्च केले असून याच १८ महिन्याच्या काळात काँग्रेसने १.८४ कोटी रु. खर्च केले आहे.

ट्रॅकरच्या नुसार सामाजिक मुद्दे, निवडणुका व राजकारण या श्रेणीत १० महत्त्वाच्या जाहिरातदारांमध्ये ४ जाहिरातदार भाजपशी संबंधित आहे. त्यातील तिघांचे पत्ते दिल्लीस्थित भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयाचा देण्यात आले आहेत.

भाजपाशी निगडित चार जाहिरातदारांची दोन कम्युनिटी पेज असून एक पेज ‘माय फर्स्ट व्होट फॉर मोदी’ने या १८ महिन्यांच्या कालावधीत १.३९ कोटी रु. तर ‘भारत के मन की बात’ने २.२४ कोटी रु. खर्च केले आहेत. हे दोन फेसबुक पेज गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तयार करण्यात आले होते.

अन्य दोन जाहिरातमधील एक पेज ‘नेशन विथ नमो’ स्वतःला न्यूज वा मीडिया वेबसाइट म्हणून दावा करत असून त्यांनी या कालावधीत १.२८ कोटी रु, खर्च केले आहेत तर अन्य एक पेज भाजपचे खासदार आर. के. सिन्हा यांच्याशी संबंधित असून त्या पेजवर ६५ लाख रु. खर्च झाला आहे. सिन्हा हे सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस या कंपनीचे मालक आहेत. ‘नेशन विथ नमो’ हे पेज २०१३ सालापासून चालवले जाते.

जर या पेजचा खर्च भाजपाशी मिळवल्यास हा आकडा १०.१७ कोटी रु. इतका जात असून या श्रेणीत जाहिरात देणार्या अन्य १० जाहिरातदारांमधील भाजपाच हिस्सा ६४ टक्के इतका होतो.

या खर्चात गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचाही खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. या निवडणुकांत भाजपला बहुमत मिळाले होते.

भाजपव्यतिरिक्त आम आदमी पार्टीने ६९ लाख रु. खर्च केले आहेत.

सामाजिक मुद्दे, निवडणुका व राजकारण या श्रेणीतल्या येणार्या जाहिरातीमधून फेसबुकला फेब्रुवारी २०१९ नंतर ५९ कोटी ६५ लाख रु. मिळाले आहेत. या जाहिराती केवळ फेसबुकवर प्रसिद्ध होत नसून त्या इन्स्टाग्राम, ऑडियन्स नेटवर्क व मेसेंजर या फेसबुकच्या अन्य अप्लिकेशनवर दिसत असतात.

गेल्या १४ ऑगस्टला अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने भारतातील फेसबुक कंपनीच्या कार्यालयाकडून व्यावसायिक हितासाठी भाजपच्या हेट स्पीच मजकुराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावरून भारतात गदारोळ माजला होता. फेसबुकला या संदर्भात स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: