भाजपचे राज्यपालांना पत्र

भाजपचे राज्यपालांना पत्र

मुंबई : सरकार अल्पमतात आले असून, सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने रात्री राज्यपालांना देण्यात आले. भारतीय

भाजपच्या घोडदौडीला बंगालमध्ये लगाम कसा बसला?  
महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा, नवीन जिंदालला समन्स बजावले
नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग ४

मुंबई : सरकार अल्पमतात आले असून, सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने रात्री राज्यपालांना देण्यात आले.

भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनघंटीवार, प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र दिले आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी केली.

खोटे पत्र

खोटे पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही राज्यपालांना इमेलने आणि प्रत्यक्ष भेटून, पत्र दिले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, की ते कॉँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर राहू इच्छित नाही. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावे.” फडणवीस म्हणाले, की राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील.

आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने, राज्यातील सत्ता संघर्षामध्ये उघड भूमिका घेतली नव्हती. देवेंद्र फडणवीस यांचा बैठका घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे वृत होते. हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे मत यापूर्वी भाजपने व्यक्त केले होते.

अफवा

दरम्यान भाजप नेते राजभवनावर पोहोचताक्षणीच भाजपने बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याचे वृत्त मराठी टीव्ही वाहिन्यांवर दिसू लागले. त्यानंतर लगेचच वाहिन्यांनी राज्यपालांनी ३० जूनला अधिवेशन बोलवल्याचे वृत्त दिले. नंतर त्या पत्रात काय काय लिहिले आहे, याचा तपशीलही वाहिन्यांनी दाखवला. त्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या. राज्यपालांचे हे पत्र नंतर सोशल मिडीयावरही पसरले. आणि लवकरच या पत्रावर २८ ऐवजी २९ तारीख असल्याचे दिसले आणि हे पत्र खोटे असल्याचे पुढे आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0