जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट

जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट

नवी दिल्लीः २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या व प्रकृतीच्या कारणावरून २०१७ पासून जामीनावर असलेल्या भाजपच्या खासदार प्रज्ञ

आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !
‘पाच तर आम्ही मारले’; हेटस्पीचवरून भाजपच्या माजी आमदाराविरोधात गुन्हा
फडणवीसांचे समाधान, राष्ट्रवादीचा कार्यक्रम

नवी दिल्लीः २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या व प्रकृतीच्या कारणावरून २०१७ पासून जामीनावर असलेल्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर या भोपाळमध्ये एका कार्यक्रमात क्रिकेट खेळताना दिसून आल्या.

भोपाळच्या शक्ती नगर भागात एका कार्यक्रमात ठाकूर या क्रिकेटची बॅट हातात घेऊन चेंडू फटकावताना दिसून आल्या. तसा एका मिनिटाचा व्हीडिओ एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात प्रज्ञा ठाकूर यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळवली होती. आपली प्रकृती बरी नसल्याने व सुरक्षिततेच्या कारणावरून मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात आपण प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही, त्यामुळे एनआयए कोर्टाने आपल्याला प्रत्यक्ष हजर राहण्याची सक्ती करू नये, अशी त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून त्यांना अनुपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. पण गेल्या दोन वर्षांत जामीन मिळाल्यानंतर त्या लोकांशी सहजपणे हसत खेळत भेटताना दिसत आहेत.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात भोपाळमधल्याच काली मंदिरात त्या स्थानिक कबड्डी खेळाडूंसोबत कबड्डी खेळताना दिसून आल्या होत्या. त्याच काळात नवरात्रौत्सवात त्या गरबा खेळताना दिसून आल्या होत्या. त्या आधी जुलैमध्ये त्या बास्केटबॉल खेळताना व एका लग्नात गाण्यावर ठेका धरत नाचताना दिसून आल्या होत्या.

प्रज्ञा ठाकूर यांनी आपली प्रकृती खूप बिघडली असल्याने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईत एनआयएच्या कोर्टात जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. पण प्रत्यक्षात त्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेताना दिसून आल्या आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात ९ वर्षे व्यतित केल्यानंतर ठाकूर यांना २०१७मध्ये जामीन मिळाला होता. या ९ वर्षाच्या तुरुंगवासात ठाकूर यांना तुरुंगात विशेष सवलती मिळत होत्या.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भोपाळमधून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकांत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा साडेतीन लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: