अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार

अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार

भीमा कोरेगाव प्रकरणात सध्या अटकेत असलेले तेलुगू कवी व सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १

एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक
सुधा भारद्वाज यांना जामीन
तेलतुंबडेंच्या बचावासाठी उभे राहणे अत्यावश्यक का आहे?

भीमा कोरेगाव प्रकरणात सध्या अटकेत असलेले तेलुगू कवी व सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवसांसाठी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे असे आदेश सरकारला दिले.

२०१८पासून वरवरा राव अटकेत असून ते तळोजा कारागृहात आहे. बुधवारी वरवरा राव यांना नानावटी उपचारासाठी नेण्याचे आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव हे मृत्यूशय्येवर असून त्यांना उपचाराची गरज आहे. सरकारला त्यावर हरकत आहे का? की ते तळोजा कारागृहात उपचार करणार आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. नंतर न्यायालयाने राव यांच्यावर नानावटीत उपचार करावेत व तेथे त्यांना दोन आठवडे ठेवावे, असे आदेश देत न्यायालय त्यांच्यावर लक्ष ठेवेल असे सरकारला सांगितले.

वरवरा राव यांचे वैद्यकीय अहवाल न्यायालयाला दाखवले पाहिजेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रुग्णालयातून डिस्जार्ज देता येईल, त्यांचे वेळोवेळी सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालयाला दाखवावेत असेही न्या. एस. एस. शिंदे व न्या. माधव जामदार यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने वरावरा राव यांना पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.

८१ वर्षांचे वरवरा राव स्मृतीभंश व अन्य शारीरिक व्याधींनी ग्रस्त असून त्यांना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली होती. पण न्यायालयाने त्यांना जामीन न देता त्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तपासणी करावी वा तसे शक्य नसल्याने कारागृहात जाऊन तपासणी करावी, या तपासणीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती असल्यास निर्णय घेता येईल, असे न्यायालयाने गेल्या आठवड्यात म्हटले होते. न्यायालय डॉक्टरांच्या अहवालावर विचार करेल व त्यानंतर राव यांना रुग्णालयात हलवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

वरवरा राव यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती ऐकल्यानंतर गेल्या २९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने वरवरा राव यांच्या जामीनावर तत्परतेने विचार करावा असे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याला कारण असे की १७ सप्टेंबरनंतर वरवरा राव यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली नव्हती. त्यामुळे एखाद्या कैद्याच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ शकते, असे न्या. ललित, न्या. सरन, न्या. भट यांच्या पीठाने मत व्यक्त केले होते.

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात न्या. मेनन व न्या. तावडे यांच्या पीठापुढे जामीन अर्जाची सुनावणी झाली होती. यावेळी वरवरा राव यांचे वकील इंदिरा जयसिंह यांनी कैद्याचे मौलिक अधिकार असतात असा मुद्दा मांडत राव यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगितले होते. त्यांना अशाच स्थितीत ठेवल्यास त्यांच्या जीवाला धोका असून तसे झाल्यास पोलिस कोठडीत मृत्यू झाला असा खटला होऊ शकतो. वरवरा राव यांना स्मृतीभंश असून त्यांना लघवी संक्रमणाचाही त्रास आहे, ते बेडवर पडून आहेत, असे न्यायालयाला सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0