बोरगडः राज्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र

बोरगडः राज्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र

जैवविविधतामुळे नाशिक जवळील बोरगड जंगलाला राज्यातील पहिला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला. या जंगलामुळे नाशिकमध्ये ३५० प्रकारचे पक्षी दिसतात त्यापैकी १२२ प्रजाती, ५२ वेगवेगळ्या फॅमिलीचे पक्षी या जंगलात दिसतात. २४ टक्के स्थलांतरित पक्षी आढळतात.

द्वेषाची कार्यशैली व दांडगाईचे राजकारण
शेतकऱ्यांचा कळवळा की खासगी कंपन्यांना पायघड्या?
केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या पूर्वेला बोरगड जंगल आहे, ते पानझडी प्रकारात येते. जंगलात साग मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वर्षांपूर्वी जंगलाचा परिसर ओसाड होता. डोंगरावर भारतीय हवाई दलाचे रडार स्टेशन आहे. नेचर कॉन्झरवेशन सोसायटी, नाशिक शाखेचे स्थापक, बिश्वरूप राहा यांनी परिसराचे संवर्धन करण्याचे काम हवाई दल, वन विभागाची आणि ग्रामस्थांसोबत सुरू केले. २००८ पासून ८ वर्षांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने प्रोजेक्ट हरियाली अंतर्गत येथे १,५०००० स्थानिक झाडांची लागवड केली. (शिवण, जांभूळ, माहुआ, कांचन, आपटा, सादडा, पांगारा, काटेसावर, पळस) गावातील लोकांना इलेक्ट्रिक चुली, गॅस सबसिडी मिळाल्यामुळे वृक्षतोड, शिकार कमी झाली.

वाढत्या जैवविविधतामुळे २००८ साली जंगलाला राज्यातील पहिला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला. झाडांमुळे किडे-किटकांची संख्या वाढली. फुल, फळ झाडे जास्त असल्याने किडे, फळ आणि पराग खाणारे पक्षी वाढले. नाशिकमध्ये ३५० प्रकारचे पक्षी दिसतात त्यापैकी १२२ प्रजाती, ५२ वेगवेगळ्या फॅमिलेचे पक्षी या जंगलात दिसतात. २४ टक्के स्थलांतरित पक्षी आढळतात. फक्त हिवाळ्यात नाही तर उन्हाळ्यामध्ये पण स्थलांतरित पक्षी येतात. सगळ्यात जास्त पक्ष्यांची नोंद हिवाळ्यात होते. स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. उदा. रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, ब्लू हेडेड रॉक थ्रश, व्हाइट बेलिड मिनिवेट, एशी ड्रोंगो.

सगळ्यात छोट्या पक्ष्यांपैकी वॉर्ब्लेर पक्षी आकाराने लहान असून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. इंडियन ब्लॅकबर्ड, ऑरेंज हेडेड थ्रश, मलाबाहर व्हिसलिंग थ्रश हे पक्षी उन्हाळ्यात प्रजननासाठी द. भारतावरून  येतात. चातक पक्षी आफ्रिकेतून पावसाळी हवेसोबत भारतात येतो. तो अंडी या जंगलातील इतर पक्ष्यांच्या घरट्यात देतो जसे की, बुलबुल, सातभाई, इ.

संपूर्ण जगामध्ये संकटग्रस्त पक्षी प्रजातींपैकी एक ब्रॉड टेल्ड ग्रासबर्ड फक्त पश्चिम घाटामध्ये आढळतो आणि याचा शोध बिश्वरूप राहा यांनी या जंगलात घेतला. त्याच सोबत अनेक वर्षांच्या निरीक्षणांत शिकारी पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे असे दिसून आले. १५ प्रकारचे शिकारी पक्षी या जंगलात दिसतात. उदा, बोनेलिज ईगल, क्रेस्टेड सर्पंट ईगन, माँटेग्युज हॅरिअर, शाहीन फाल्कन, इंडियन ईगल ऑउल इ. हे शिकारी पक्षी हे सशक्त परिस्थितीकीचे निर्देशांक मानले जातात. हे पक्षी ज्या जंगलात असतात तेथे छोट्या पक्ष्यांची संख्या जास्त असते आणि वातावरण शुद्ध असते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. जंगलात ककू पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे ( उदा. जॅकोबीन ककू, बँडेड बे ककू, कॉमन हॉक ककू, ब्लॅक हेडेड बकू शिर्क, ग्रे बेलिड ककू, एशियन कोअल,ब्लॅक हेडेड ककू). हे पक्षी अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात देतात, स्वतःच घरटं न बांधता. म्हणून त्यांची संख्या जेथे जास्त असते ते जंगल जैवविविधतापूर्ण असते असे आम्हाला वाटते.

दीर्घकालीन संवर्धन करून ओसाड प्रदेशाचे रूपांतर जैवविविधताने समृद्ध अशा जंगलात झाले. केवळ पक्षीच नाही तर एकूणच जैवविविधतेत वाढ होत आहे. भूजल पातळी वाढल्याने अनेक ग्रामस्थांना लाभ झाला आहे. आता गावकरी उन्हाळ्यातही शेती करतात. ही सर्वांसाठी विजयाची परिस्थिती आहे. हे संवर्धन कार्य इतर गावांसाठी एक उत्तम उदाहरण ठरले.

प्रतिक्षा व पूजा कोथुळे, या नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, नाशिकमध्ये काम करतात.

(छायाचित्र सौजन्यः दिवंगत बिश्वरूप राहा (संस्थापक एनसीएसएन)

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0