बुलीबाई अॅप: मुख्य आरोपीला आसाममधून अटक

बुलीबाई अॅप: मुख्य आरोपीला आसाममधून अटक

नवी दिल्ली:’ ‘बुलीबाई’ अॅप तयार केल्याच्या आरोपावरून आसाममधील २१ वर्षांच्या तरुणाला अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा व वास्तव
अहमदनगर रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे आदेश  
ओमायक्रॉनचे आव्हान चिंता वाढवणारेः मुख्यमंत्री

नवी दिल्ली:’ ‘बुलीबाई’ अॅप तयार केल्याच्या आरोपावरून आसाममधील २१ वर्षांच्या तरुणाला अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, दिल्लीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्या तरुणाचे नाव नीरज बिष्णोई असे सांगितले. त्याला दिल्लीला आणले गेले आहे आणि गुरुवारी पोलीस कोठडी मागण्यासाठी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गिटहबवरील ‘बुलीबाई’ तयार करण्यामागील मुख्य सुत्रधार बिष्णोई आहे असे पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले. अॅपचे ट्विटर अकाउंटही त्याच्याच नावाने आहे असे मल्होत्रा म्हणाले.

बिष्णोई हा भोपाळच्या एका महाविद्यालयातील इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणारा विद्यार्थी आहे. त्याला आसाममधील जोरहाट या त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली.

या अॅपद्वारे मुस्लिम स्त्रियांना लक्ष्य केले जात होते. लक्ष्य केल्या गेलेल्या स्त्रियांमध्ये पत्रकार, कार्यकर्त्या तसेच विद्यार्थिनी होत्या. याआधी आलेल्या ‘सुल्ली डील्स’ अॅपप्रमाणे या अॅपमध्येही मुस्लिम स्त्रियांचा ‘लिलाव’ केला जात होता. यावर सोशल मीडिया अॅप्सवरून चोरलेल्या फोटोंद्वारे ‘लिलाव’ केला जात होता. हे कृत्य “ऑनलाइन लैंगिक हिंसाचार” समजले जाते. तसेच हा “मानवी तस्करी व लैंगिक गुलामगिरी”चा प्रसार करणारा गुन्हाही समजला जातो.

बिष्णोईने अॅप तयार केल्याची ‘कबुली’ दिली असा दावा मल्होत्रा यांनी केला आहे.  त्याच्या लॅपटॉपवरून अॅप तयार करण्यातील न्यायवैद्यकीय अवशेषही प्राप्त केल्याचे ते म्हणाले. त्याला गुरुवारी सकाळी लवकर जोरहाटमधून अटक करण्यात आली असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिष्णोई भोपाळ येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीजमध्ये बीटेकचे शिक्षण घेत आहे. त्याला अटक करण्याचे काम १२ तास चालले असे आसाम पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी माहिती दिल्यानंतर काही तासातच अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलीसही या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. मात्र, त्यांनी यासंदर्भात जोरहाट येथील पोलिसांशी संपर्क केला नाही. मुंबई पोलीस एका स्वतंत्र तक्रारीवरून या प्रकरणात तपास करत आहेत. त्यात त्यांनी तीन तरुणींना अटक केली आहे. त्यात दोन २१ वर्षीय तर एका १८ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या मते, एक १८ वर्षीय तरुणी या प्रकरणाची ‘सूत्रधार’ आहे. आत्तापर्यंत अटक झालेल्या चौघांपैकी दोघे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत.

मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यातील १८ वर्षीय मुलीने अॅपचे ट्विटर हॅण्डल तयार केले होते. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बुधवारी वार्ताहरांना सांगितले.

या अॅपद्वारे लक्ष्य करण्यात आलेल्या स्त्रियांमध्ये ‘द वायर’च्या पत्रकार इस्मत अरा यांचाही समावेश होता. त्यांनी दिल्ली पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. अरा यांनी केलेल्या तक्रारीमध्ये, भारतीय दंड संहितेच्या १५३ अ (दोन गटांमध्ये धर्माच्या आधारे शत्रुत्व निर्माण करणे), १५३ बी (राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारी कृत्ये), ३५४ ए (लैंगिक छळ), ५०६ (गुन्हेगारी दहशत निर्माण करणे) आणि ५०९ (स्त्रियांचा अवमान करणारे शब्द, आवाज किंवा हावभाव) यांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील काही तरतुदीही वापरण्याची मागणी अरा यांनी केली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: