देशातल्या सर्व पोटनिवडणुकांत भाजपची सरशी

देशातल्या सर्व पोटनिवडणुकांत भाजपची सरशी

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणूक उल्लेखनीय कामगिरी करणार्या भाजपने ११ राज्यांमधील ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकातही बहुतांश जागा जिंकल्या आहेत. भ

भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आणि घातकहीः मनमोहन सिंग
कर्नाटकात भाजपला धक्का
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणूक उल्लेखनीय कामगिरी करणार्या भाजपने ११ राज्यांमधील ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकातही बहुतांश जागा जिंकल्या आहेत. भाजपची सर्वात चांगली कामगिरी मध्य प्रदेशात झाली असून येथील २८ जागांमधील ९ जागा मिळवून म. प्रदेश विधानसभेत बहुमत मिळवले. त्याचबरोबर भाजप अन्य ११ जागांवर आघाडीवर आहे. भाजपचा आता म. प्रदेश विधानसभेत आकडा ११६ इतका झाला आहे.

गेल्या मार्चमध्ये काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २२ आमदारांनी पक्षात बंडखोरी केली होती. त्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते.

बंडखोरी केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.

मणिपूर

भाजपला या राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये २ जागा तर अन्य एक जागा अपक्षाला मिळाली असून भाजपचे उमेदवार ओईनाम लुखोई सिंग व पूनम ब्रोजेन सिंग यांनी वांगोई व वांगजिंग या २ जागा जिंकल्या आहेत.  

हरियाणा

राज्यातील बरोडा विधानसभा जागा काँग्रेसच्या खात्यात गेली असून इंदू राज नरवाल यांनी भाजप पुरस्कृत व ऑलिम्पिक कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांचा १०,५६६ मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून योगेश्वर दत्त यांना दुसर्यांदा पराभव चाखायला मिळाला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकांत ते ४८०० मतांनी हरले होते. काँग्रेसचे उमेदवार क्रिशन हुडा यांनी त्यांना हरवले होते. हुडा यांचा गेल्या एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता.

तेलंगण

भाजपचे उमेदवार एम. रघुनंदन राव यांनी १,०७९ मतांनी डुब्बाक पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.

ओदिशा

सत्तारुढ बीजेडीचे बिजया शंकर दास तिरतोल १८व्या फेरीनंतर २७,६६५ मतांनी आघाडीवर होते. बालासोरमध्ये बीजेडी पुरस्कृत स्वरुप कुमार दास भाजपचे मानस कुमार दत्त यांच्यापुढे ७,३६४ मतांनी होते.

नागालँड

सत्तारुढ एनडीपीपी पुरस्कृत मेडो योखा यांनी दक्षिण अंगामी जागा मिळवली.

गुजरात

गुजरातमध्ये सर्वच्या सर्व ८ जागा भाजपने जिंकल्या. गेल्या जूनमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामे दिले होते. या ८ पैकी ५ जणांनी भाजप प्रवेश केला होता.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातल्या ७ जागांपैकी ६ जागा भाजपने तर १ जागा समाजवादी पार्टीने जिंकली. या निवडणुका तुंडला, घातमपूर, नौंगाव सादत, बुलंदशहर, बंगेरमाऊ, देवरिया व मल्हानी येथे झाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0