‘डॉ. काफील खान यांची सुटका व्हावी की नाही’

‘डॉ. काफील खान यांची सुटका व्हावी की नाही’

नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील डॉ. काफील खान यांच्या सुटकेसंदर्भातील अंतिम उत्तर येत्या १५ दिवसात द्यावे, असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच

अलाहाबाद साथीच्या रोगांच्या उंबरठ्यावर!
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये होत असलेल्या खोट्या चकमकी ‘‘अत्यंत चिंताजनक” – संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समिती
चिथावणीखोर भाषणाचा आरोप : डॉ. काफील यांना अटक

नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील डॉ. काफील खान यांच्या सुटकेसंदर्भातील अंतिम उत्तर येत्या १५ दिवसात द्यावे, असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले.

गेल्या जानेवारी महिन्यात डॉ. काफील खान यांना सीएएविरोधात निदर्शने केल्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात डॉ. काफील खान यांनी अलिगड विद्यापीठात सीएए कायद्याबाबत चिथावणीखोर भाषण केले होते असा पोलिसांचा आरोप असून मुंबईत  ते सीएएविरोधी कार्यक्रमास उपस्थित होण्यासाठी आले असताना त्यांना विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर १० फेब्रुवारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. काफील खान यांना जामीन दिला होता पण तीन दिवसानंतरही जेल प्रशासनाने त्यांची सुटका केली नव्हती. त्यामुळे डॉ. काफील खान यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्या प्रकरणात अलिगड येथील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी डॉ. काफील खान यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. पण हा आदेश आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डॉ. काफील खान यांना रासुका खाली अटक करून त्यांना मथुरा येथे तुरुंगात ठेवले.

गेल्या मे महिन्यात डॉ. काफील खान यांच्या रासुकाचा कालावधी ३ महिन्यांनी वाढवण्यात आला होता. त्यानंतर ६ ऑगस्टला अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र व उ. प्रदेश सरकारला या प्रकरणाबाबत आपला जबाब मांडण्यास सांगितले होते.

बुधवारी या प्रकरणाची सुनावणी न्या. मनोज मिश्रा व न्या. दीपक वर्मा यांच्या पीठापुढे झाली असता त्यांनी १९ ऑगस्टला सुनावणी केली जाईल असे सांगितले. तसेच १५ दिवसांत डॉ. काफील खान यांची सुटका केली जाणार आहे की नाही, याचे उत्तर अलाहाबाद उच्च न्यायालयाला देण्यास सांगितले.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: