१०० रु. कमाई, ९८ रु. खर्च : भारतीय रेल्वेची कामगिरी

१०० रु. कमाई, ९८ रु. खर्च : भारतीय रेल्वेची कामगिरी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने २०१७-१८ या सालात रेल्वेची सेवा देताना १०० रु. कमावले पण त्यापैकी ९८.४४ रु. खर्च केल्याची माहिती कॅगने दिली आहे. ही आकडेवा

ट्रोलिंगपुढे गुडघे टेकून लष्कराने दिला दीर्घ परंपरेचा बळी
९ पत्रकारांवर गुन्हेः भाजप मंत्र्यांचे त्यावर मौन का?
शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने २०१७-१८ या सालात रेल्वेची सेवा देताना १०० रु. कमावले पण त्यापैकी ९८.४४ रु. खर्च केल्याची माहिती कॅगने दिली आहे. ही आकडेवारी गेल्या १० वर्षांतील सर्वात खराब कामगिरी असल्याचा शेराही कॅगने मारला आहे. रेल्वेच्या परिभाषिक संकल्पनेत त्याला ऑपरेटिंग रेशो म्हणतात. हा ऑपरेटिंग रेशो सातत्याने वाढत चालल्याबद्दलही कॅगने चिंता व्यक्त केली आहे.

कॅगच्या अहवालात गेल्या १० वर्षांतील ऑपरेटिंग रेशोची टक्केवारी देण्यात आली आहे. त्यानुसार २००८-०९मध्ये ९०.४८, २००९-१० मध्ये ९५.२८, २०१०-११मध्ये ९४.५९, २०११-१२मध्ये ९४.८५, २०१२-१३मध्ये ९०.१९, २०१३-१४मध्ये ९३.६, २०१४-१५मध्ये ९१.२५, २०१५-१६मध्ये ९०.४९, २०१६-१७मध्ये ९८६-५ तर २०१७-१८मध्ये ९८.४४ टक्के ऑपरेशन रेशोची नोंद झाली आहे.

या खराब ऑपरेशन रेशोवर टिप्पण्णी करताना कॅगने रेल्वेला महसूल वाढवण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूदींवर अवलंबून न राहता अन्य पर्यायांचा त्वरित शोध घेण्याची सूचना केली आहे. गेल्या दोन वर्षांत रेल्वेने आयबीआर-आयएफच्या माध्यमातून मिळवलेला महसूल खर्च केलेला नाही. त्यामुळे रेल्वेने बाजारातून उभी केलेल्या भांडवलाचा योग्य वापर करण्याची गरज आहे, असे कॅगने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0