कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

पंजाबचे अनेकवर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आकळण्यापलीकडच्या लीलाताई…
मोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप
कोरोनावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गुणकारी नाही : रिपोर्ट

पंजाबचे अनेकवर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा दिला.

पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्याचे समजते. त्यानंतर त्यांच्याकडून नकार आल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत देखील काही संकेत दिले.

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस हायकमांडविषयी नाराजी व्यक्त केली. “मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितले होते, की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होत आहे. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटते की हा माझ्यावर अविश्वास आहे. त्यांना असे वाटले, की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे.”

आपल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावे, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. “दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवले. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना ते मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठीक आहे”, असे सिंग म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीविषयी सूचक विधान केले. “माझ्याकडे भावी वाटचालीसाठी नेहमीच पर्याय असणार आहे. त्याविषयी मी भविष्यात निर्णय घेईन. मला ५२ वर्ष राजकारणात झाली आहेत. त्यातली ९.५ वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि नंतर पुढचा निर्णय घेईन”, असे ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0