भिन्न प्रकरणांत २ दलितांची हत्या; पोलिसांची उशीरा कृती

भिन्न प्रकरणांत २ दलितांची हत्या; पोलिसांची उशीरा कृती

राज्यात दोन वेगवेगळ्या घटनात जातीयवादातून दोन दलित तरुणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना २७ मे रोजी नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात थडीपावनी गावात

आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?
मला दिसलेलं महाराष्ट्राचं भीषण दारिद्रय
गाडीला हात लावला म्हणून दलित युवकाला मारहाण

राज्यात दोन वेगवेगळ्या घटनात जातीयवादातून दोन दलित तरुणांचा मृत्यू झाला आहे.

पहिली घटना २७ मे रोजी नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात थडीपावनी गावात येथे घडली. वंचित बहुजन आघाडीचे सक्रीय कार्यकर्ते अरविंद बनसोड (३२) व त्यांचा मित्र गजानन राऊत यांना ओबीसी कुणबी समाजातील काही जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरविंद बनसोड यांचा मृत्यू झाल्याचा संशय असून पोलिसांनी मात्र संपूर्ण तपास करण्याअगोदर बनसोड यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले.

या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी मिथिलेश ऊर्फ मयुरेश उमरकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता असून त्याचे वडील बंडोपंत उमरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख नरखेड तालुक्याचे आहेत.

बनसोड व राऊत हे दोघे मित्र असून ते पिंपळधारा या गावातून थडीपवनी या गावाकडे जात होते. बनसोड हे पैसे हवेत म्हणून एका एटीएम केंद्रात गेले तर. राऊत त्यांच्या गावातील एका वृद्ध महिलेला गॅस रिफिल करून हवा होता म्हणून एटीएमजवळच्या एचपी गॅस दुकानात गॅस रिफिलसाठी चौकशी करू लागले.

‘या दुकानाच्या फलकावर अनेक दूरध्वनी क्रमांक असल्याने मी माझ्या मोबाइल फोनमधून दुकानावरच्या फलकाचा फोटो काढला. हा फोटो काढल्याबद्दल दुकानाच्या मालकाने (ते आरोपी आहेत) आक्षेप घेत फोन हिसकावून घेतला. दरम्यान बनसोड एटीएम केंद्रातून बाहेर पडले आणि त्यांनी वादात हस्तक्षेप केला. दोन दलित आपल्याशी वाद घालत आहे, हे सहन न होऊन उमरकर व त्यांच्या मित्रांनी आम्हाला शिव्या दिल्या व बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, असे गजानन राऊत यांनी सांगितले.

नंतर या मारहाणीतून सुटका करून दोघेही घटनास्थळाहून निघाले. मध्ये एका ठिकाणी गाडीत पेट्रोल हवे म्हणून राऊत यांनी बनसोड यांना एका दुकानाच्या बाहेर वाट थांबण्यास सांगितले. ते पेट्रोल आणण्यास गेले. ते पेट्रोल घेऊन पाच मिनिटांनंतर आले तेव्हा त्यांना बनसोड बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. तर बनसोड यांच्याशेजारी कीटकनाशकाची बाटली होती.

या प्रकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे एक कार्यकर्ते सुमेध गोंदाणे यांनी सांगितले की, राऊत जेव्हा पुन्हा परत आले तेव्हा उमरकर व त्यांचे काही साथीदार बनसोड यांना कारमध्ये घेऊन हॉस्पिटलकडे रवाना झाले पण त्यांनी राऊत यांना कारमध्ये घेतले नाही.

उमरकर यांचे वर्तन पहिल्यापासून संशयित स्वरुपाचे होते. त्यात पोलिसांनी बनसोड यांच्या मृत्यूचे कारण न तपासता त्यांनी आत्महत्या केल्याचे जाहीर केले असा आरोप गजानन यांनी केल्याचे गोंदाने सांगतात.

दरम्यान, बनसोड यांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व अनेक कार्यकर्त्यांनी केली असून ही चौकशी निःपक्षपाती व्हावी असेही यांचे म्हणणे आहे. काही कार्यकर्त्यांनी बनसोड यांचा मृत्यू आत्महत्या नसल्याचाही दावा केला आहे. या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशीही मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांची पहिल्यापासून भूमिका संशयास्पद असल्याने नागालँड काडरचे आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे जे नागपूरचे मूळ रहिवासी आहेत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.

९ जून रोजी १५ कार्यकर्ते व प्रतिनिधींच्या समितीने नागपूर रेंजचे पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची भेट घेतली. या भेटीत वास्तव काय आहे हे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मूळ फिर्यादीत बदल करून अट्रोसिटी कायद्यातील तरतूदी समाविष्ट केल्या असून पीडितांच्या कुटुंबियांना व मित्रांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

पुण्यातील हत्या

पिंपरी चिंचडवड तालुक्यातील पिंपळे सौदागर येथे मराठा समाजातल्या सहा जणांनी ७ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास २० वर्षाच्या विराज जगताप याच्यावर रॉडने हल्ला केला व त्याच्या अंगावर टेम्पो नेला. या हल्ल्यात विराज गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण दुसर्या दिवशी तो मरण पावला.

विराजवर हा हल्ला करण्यामागचे कारण असे की, त्याचे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम होते.

या प्रकरणात पोलिसांनी हेमंत काटे, सागर काटे, कैलाश काटे व जगदीश काटे अशा चौघांना ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात नेण्यात आले आहे.

विराज व जगदीश काटे यांच्या मुलीचे काही महिन्यापासून प्रेम प्रकरण सुरू होते पण जगदीश काटे यांचा त्यांच्या संबंधांना विरोध होता. विराज याच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार जगदीश काटे यांनी दोन महिन्यापूर्वी विराजला या प्रकरणातून स्वतः बाहेर पडावे अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली होती.

विराजच्या घरातल्यांना या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. त्यांना विराजचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मित्रांकडून हे सगळे प्रकरण कळल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या कुटुंबियांना हे प्रेम प्रकरण माहिती होते व त्यांचे या दोघांवर बारीक लक्ष होते. त्यांनी विराजला जीवे मारण्याची धमकीही दिली होती, हे सगळे त्याने आम्हाला आधी सांगायला हवे होते, अशी प्रतिक्रिया विराजचे काका जितेश जगताप यांनी द वायरला दिली.

जितेश यांनी या प्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे पण पोलिसांनी आपली फिर्याद योग्यरित्या घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. विराज जिवंत असताना सांगवी पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार दाखल करायला गेलो तर पोलिसांनी ही घटना किरकोळ असल्याचे सांगितले. विराजला ७ जूनला मारहाण झाली पण पोलिसांनी आमची तक्रार विराजचा मृत्यू झाल्यानंतर ८ जूनला नोंदवून घेतली असे जितेश यांनी सांगितले.

याबाबत सांगवी पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी योग्यरित्या प्रकरण नोंद केले असून डॉक्टरांच्या अहवालाची वाट पाहात आहोत. त्यानंतर अंतिम फिर्याद तयार करण्यात येणार आहे. विराजला मारहाण झाल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ व चिंताजनक होती. त्याची प्रकृती स्थिर होण्याची आम्ही वाट पाहात होतो पण दुर्दैवाने त्याचा दुसर्या दिवशी मृत्यू झाला. आम्ही लगेचच आरोपींना अटक करून त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली असे इन्स्पेक्टर अजय भोसले यांनी द वायरला सांगितले. हे प्रकरण आता पुढील तपासासाठी पोलिस उपअधिक्षक श्रीधर जाधव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

अट्रोसिटीच्या प्रकरणात वाढ

गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात ८ ते ९ प्रकरणे ही जातीय विद्वेषाची असल्याचे या घटनांवर लक्ष ठेवणारे प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे संपादक जीतरत्न पटाईट यांचे म्हणणे आहे. बहुतांश प्रकरणे मराठवाडा विभागातील जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील आहे. या प्रकरणांमध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत या प्रकरणात जातविरोधात संघर्ष करणारे कार्यकर्ते पडत नाहीत तोपर्यंत पोलिसांचा तपास थंड असल्याचे पटाईट सांगतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0