देशात ओबीसी ४४.४ टक्के

देशात ओबीसी ४४.४ टक्के

नवी दिल्लीः जातीच्या जनगणना करण्याच्या मागणीवरून देशभर विरोधी पक्ष आक्रमक असताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशातील १७ कोटी २४ ला

‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’
आधार क्रमांक समाज माध्यमांशी जोडण्याची मागणी
आसाममधील एनआरसी डेटा गायब

नवी दिल्लीः जातीच्या जनगणना करण्याच्या मागणीवरून देशभर विरोधी पक्ष आक्रमक असताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशातील १७ कोटी २४ लाख ग्रामीण कुटुंबातील ४४.४ टक्के कुटुंबे ओबीसी असल्याची माहिती पुढे आली आहे. ओबीसींची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडू (६७.७ टक्के), बिहार (५८.१ टक्के), तेलंगण (५७.४ टक्के), उ.प्रदेश (५६.३ टक्के), केरळ (५५.२ टक्के), कर्नाटक (५१.६ टक्के) व छत्तीसगड (५१.४ टक्के) येथे असून या ७ राज्यांत लोकसभेच्या २३५ जागा आहेत.

या राज्यानंतर राजस्थानमध्ये ४६.८, आंध्र प्रदेशात ४५.८, गुजरातमध्ये ४५.४, सिक्कीममध्ये ४५ टक्के लोकसंख्या ओबीसी वर्गातील आहे. ही एकूण संख्या ४४.४ टक्के आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने या महिन्याच्या सुरूवातीलाच Situation Assessment of Agricultural Households and Land and Holding of Households in Rural India 2019 हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यातून देशातील ओबीसींची टक्केवारी पुढे आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार देशातील १७ कोटी २४ लाख ग्रामीण कुटुंबातील ४४.४ टक्के कुटुंबे ओबीसी, २१.६ टक्के कुटुंबे अनु. जाती, १२.३ टक्के कुटुंबे अनु. जमाती व २१.७ टक्के कुटुंबे अन्य वर्गातील आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार देशातील ९.३ कोटी शेतकरी कुटुंबांतील ४५.८ टक्के लोकसंख्या ओबीसी, १५.९ टक्के लोकसंख्या अनु. जाती, १४.२ टक्के अनु. जमाती व २४.१ टक्के लोकसंख्या अन्य वर्गातील आहे.

या सर्वेक्षणातून एका शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १०,२१८ रु. इतके असून ओबीसी शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न ९,९७७ रु, अनु. जातीचे ८१४२ रु, अनु. जमाती कुटुंबाचे दरमहा उत्पन्न ८,९७९ रु. इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य वर्गातील शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १२,८०६ रु. इतके आहे.

मोदी सरकारने जातीची जनगणना करण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर ही माहिती उघडकीस आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: