‘कंगना तुला जातीबद्दल काय माहिती आहे?’

‘कंगना तुला जातीबद्दल काय माहिती आहे?’

प्रिय कंगना, तू मजेत असशील अशी शुभेच्छा. मला तुझ्या एका ट्विटबद्दल तुला पत्र लिहायचं होतं. २३ ऑगस्ट रोजी 'द प्रिंट'चे संस्थापक शेखर गुप्ता यांनी

आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?
दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड
आरोग्य सेवेत मुस्लिम, दलित-आदिवासींशी भेदभाव

प्रिय कंगना,

तू मजेत असशील अशी शुभेच्छा. मला तुझ्या एका ट्विटबद्दल तुला पत्र लिहायचं होतं.

२३ ऑगस्ट रोजी ‘द प्रिंट’चे संस्थापक शेखर गुप्ता यांनी पत्रकार दिलीप मंडल यांचा “ऑप्रा विनफ्रे सेंट अ बुक ऑन कास्ट टू हंडरेड यूएस सीईओज बट इंडियन्स स्टिल वोण्ट टॉक अबाउट इट” या शीर्षकाचा लेख शेअर केला.

त्याच्या उत्तरादाखल तू लिहिलेस: “आधुनिक भारतीयांनी जातिव्यवस्था नाकारली आहे, कायदा व सुव्यवस्थेनुसार हे आता स्वीकारले जाणार नाही हे लहान गावांतही प्रत्येकाला माहीत नाही, हा आता काही जणांसाठी निव्वळ असुरी आनंदाचा विषय आहे, फक्त आपल्या राज्यघटनेने आरक्षणाच्या स्वरूपात जातिव्यवस्था धरून ठेवली आहे, आपण याबद्दल बोलूया.”

तू पुढे लिहिलंस: “विशेषत: डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वैमानिक वगैरे व्यवसायांमध्ये बहुतेक पात्र लोकांना आरक्षणामुळे भोगावे लागते, आपण एक राष्ट्र म्हणून सुमारपणा खपवून घ्यावा लागतो आणि हुशारी काहीशा नाराजीनेच अमेरिकेकडे निघून जाते.. लज्जास्पद.”

मी दलित समाजातली आहे. मी माझ्या कुटुंबातली पहिली एम.फिल. आहे. माझे आईवडील मजुरी करत होते, आई अजूनही तेच करते. कडाक्याच्या उन्हाळ्यात ती बांधकामांच्या ठिकाणी माती आणि दगड वाहण्याचं काम करते.

माझे आई किंवा वडील दोघेही शिकलेले नाहीत पण त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. माझ्या भावंडांमध्ये मी सर्वांत जास्त शिकले. जोपर्यंत साध्य करण्यासारखं काहीतरी दिसत राहील, तोपर्यंत मी त्यासाठी अभ्यास करत राहीन, अशी खूणगाठ मी अगदी लहानपणीच मनाशी बांधली होती. मी ज्या जिन्यावर पाय ठेवणार होते त्याच्या प्रत्येक पायरीवर काटे पसरलेले आहेत, हे तेव्हा मला माहीत नव्हतं.

आधुनिक भारतीयांनी जातिव्यवस्था “नाकारली” आहे असं तुला वाटतं. मात्र, आंतरराष्ट्रीय माध्यम कंपन्यांच्या पुरोगामी-उदारमतवादी वातावरणातही मी जातिव्यवस्था पाळणारे आधुनिक भारतीय पाहिले आहेत. ते मला त्यांच्या बरोबरची समजू शकत नाहीत, मी त्यांच्या टीममध्ये काम करते याचा त्यांना त्रास होतो. आणि यामागचं कारण मी दलित आहे हेच, असं मला वाटतं.

चित्रपटसृष्टीतलं कोणतंही मोठं नाव बघ. त्यापैकी कोणीच सीमांत समाजातून आलेले नाहीत. आधुनिक भारतीयांना जातिव्यवस्था नाकारली आहे, तर मग हे काय आहे?

जात नाकारणे म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याची सुरुवात म्हणून सर्वप्रथम तू तुझा राजपूत असल्याबद्दलचा अभिमान नाकारू शकतेस. आपल्या ओळखीचा अभिमान असलेल्या तुमच्यातल्या लोकांनी अन्य काही समुदायांची नावं शिव्यांसारखी करून टाकली आहेत. सलमान खान, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हा आणि युवराज सिंग यांसारखे आधुनिक भारतीय “भंग्या”सारखं दिसण्याबद्दल काय म्हणाले होते तुला आठवतंय का? प्रत्यक्षात लोकांना उद्देशून हा शब्द वापरला जातो, हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.

हा प्रकार खासगी क्षेत्रात तर सर्वत्र आहेच. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ३१ न्यायाधीशांपैकी एक दलित आहेत, तर दोन ओबीसी आहेत. आदिवासी समाजातील एकही न्यायाधीश नाहीत. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये एकही आदिवासी संपादकपदावर नाही. आम्हाला केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरकाव करायला मिळतो, कारण, सरकारचे हात आरक्षणाने बांधले आहेत.

नवी दिल्लीसारख्या महानगरात लहानाची मोठी होण्याच्या माझ्या अनुभवातून मी तुला आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगू शकते. कोट्यवधी दलित आणि मागासवर्गीय तथाकथित ‘सवर्णां’पुढे बोलायलाही घाबरतात, मग शिक्षण घेणं किंवा आरक्षणाचे लाभ घेणं याबद्दल विसरूनच जा.

राणावत मॅडम, तुम्ही मैला स्वच्छ करणाऱ्या लोकांच्या जाती कधी विचारल्या तरी आहेत का? मी तुम्हाला सांगते- ते सगळे दलित आहेत. कोणत्याही तथाकथित उच्चवर्णीय जातींचे लोक तुमचा मैला का स्वच्छ करत नाहीत? अमानवी स्थितीत जगत आणि मरत का नाहीत? आपल्या समाजातील या वास्तवांबद्दल माहिती घेणं फारसं कठीण नाही. तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल, तर रोजचं वृत्तपत्र हातात घेऊन बघा. जातीवर आधारित अत्याचाराची एक तरी बातमी तुम्हाला वाचायला मिळेल याची हमी मी देते.

जातीवरून खून होतात. त्यातले काही “संस्थात्मक खून” असतात. आपला जात्यंध समाज रोहित वेमुला किंवा पायल तडवीसारख्या विद्यार्थ्यांना आत्महत्येपर्यंत ढकलतो. जातीवरून झालेल्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीत माझंही नाव कदाचित दिसलं असतं. मी त्या रस्त्यावरून गेले आहे. आमचा छळ करण्याची, आम्हाला कमी लेखण्याची एकही संधी ‘आधुनिक’ भारतीय सोडत नाहीत. आणि आम्ही या दबावातही टिकून राहिलो, तर आमच्या यशाचं श्रेय लाटण्याचे कट समाज रचत राहतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ मी नुकतंच वाचलं. त्यांच्या पदव्या, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची हुशारी, त्याचं शिक्षण या सगळ्यावर त्यांच्या जातीमुळे बोळा फिरवला जात होता. त्यांना आलेल्या या अनुभवांमुळेच आरक्षणाला राज्यघटनेत स्थान मिळालं. आरक्षणाची तरतूद नसतील तर आमच्यासारखे सीमांत समुदायातले लोक कधीच पुढे पाऊल टाकू शकले नसते. मी आज जी काही आहे, ती केवळ आरक्षणामुळे आहे. आम्ही आहोत, कारण, ते (डॉ. आंबेडकर) आमच्यासाठी होते.

आम्हाला स्वप्नं बघण्याचा हक्कच नाही, असं समाज आम्हाला सांगतो. आम्ही शिकलो, चांगलं राहू लागलो तरीही ‘आधुनिक’ भारतीय आमच्या खच्चीकरणासाठी कट करत राहतात. मी या अन्यायाला बळी पडले होते पण मी सत्य बोलण्यास घाबरत नाही. मला हे बळ बाबासाहेबांच्या राज्यघटनेतून मिळालं आहे.

आरक्षण संपवायचं असेल, तर तुमच्यात, तुमच्या तथाकथित ‘वरच्या’ जातींमध्ये बदल घडला पाहिजे. तुला आलेल्या सगळ्या उत्तरांतून तुला विचार करण्यासाठी मदत मिळेल अशी आशा मी व्यक्त करते.

खरोखरीच तुझी,

मीना कोतवाल

मीना कोतवाल या मुक्तपत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: